बीड तुळजापूर दिनांक 9 प्रतिनिधी.
जालना जिल्ह्यातील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण करणारे मराठा आरक्षणाचे आंदोलन प्रतिनिधी जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या अकराव्या दिवशी त्यांची अत्यावश्य असलेली प्रकृती लक्षात घेऊन त्यांच्या मातोश्री प्रभावती पाटील या उपोषण स्थळी आल्या तेव्हा शेकडो कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले सबंध वातावरण गंभीर बनले आई डोळ्यासमोर येतात जरांगे पाटील यांच्या डोळ्यात सहजपणे अश्रू ओघळू लागले.
आपल्या पोटाचा गोळा असतो मराठा आंदोलन करणारे आरक्षणाचे कडवे आंदोलन जरांगे पाटील अकरा दिवसापासून अन्न न घेतल्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली होती आणि वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना सलाईन दिले जात होते जरांगे पाटील यांची तब्येत लक्षात घेऊन प्रशासनाने देखील त्या दृष्टीने पावले टाकलेली होती. कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण मिळवायचे अशा निर्धाराने उपोषणास बसलेले जरांगे पाटील अकराव्या दिवशी अन्न न घेता झोपून उपोषणाला बसले होते. ही वार्ता आई पर्यंत पोहोचली आणि तिला देखील आपल्या लेकराला पहावं असं वाटल्यामुळे ती उपोषणाच्या स्थळी आली तत्पूर्वी त्यांना सलाईन देण्यात आले होते .
वैद्यकीय अधिकारी त्यांच्या तब्येतीची तपासणी करून गेलेले होते त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्याकडून वेगवेगळ्या सूचना देखील दिला जात होत्या परंतु आता आरक्षण घेतल्याशिवाय पाणी घ्यायचे नाही असा निर्धार मनामध्ये केलेले जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील शीर्ष नेते प्रयत्नशील होते भेटत होते राज्याच्या राजकारणामध्ये जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या या आंदोलनामुळे खळबळ माजली सरकार देखील जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावे यासाठी मागील तीन दिवसापासून माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना शासनाचा प्रतिनिधी म्हणून पाठवून जरांगे पाटील यांच्याबरोबर चर्चा घडवून आणत होते परंतु या चर्चेला अंतिम रूप आलेले नसून महाराष्ट्र सरकारने जालना येथील आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचे विशिष्ट मंडळ आणि राज्य सरकार यांच्यामध्ये मुंबई येथे आरक्षणाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलावणे दिल्यानंतर देखील जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच होते याच पार्श्वभूमीवर त्यांच्या मातोश्री प्रभावती पाटील या सकाळी 11 च्या सुमारास उपोषणाच्या ठिकाणी आल्या होत्या आंदोलनाच्या निमित्ताने जरांगे पाटील हे प्रसारमाध्यमाशी बोलत होते आणि त्यांच्या गंभीर आवाजामध्ये आणि चिंताग्रस्त चेहऱ्यावर आरक्षणाच्या विषयाची गंभीरचा स्पष्ट जाणवत होते.
याच प्रसारमाध्यमाशी बोलण्याच्या प्रसंगांमध्ये त्यांच्या मातोश्री प्रभावती पाटील या जरांगे पाटील यांच्या नजरेसमोर आल्या आणि क्षणार्धात आईला पाहता सरांचे पाटील यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू वाहू लागले जरांगे पाटील यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्यांच्यासोबत असणारे सर्व कार्यकर्ते देखील त्यांच्या डोळ्यांमधून जरांगे पाटील यांच्याप्रमाणे अश्रू टाळू लागले सर्व वातावरण गंभीर होऊन गेले. जरांगे पाटील यांच्या मातोश्री आणि त्यांची भेट झाली आणि त्यांनी एकमेकाला कडाडून मिठी मारली सुमारे सात मिनिटे त्यांनी एकमेकाला मिठी मारली तेव्हा येथे निर्माण झालेले वातावरण या विषयाचे गांभीर्य सहजपणे दाखवून देते . आई आणि मुलाचे हे प्रेम त्याचबरोबर आरक्षणाच्या विषयावर असलेली जरांगे पाटील यांची खंबीर भूमिका आणि या खंबीर भूमिकेच्या भोवती असणारे कार्यकर्त्यांचे वलय या सर्व बाबी लक्षात घेता मातोश्री प्रभावती पाटील देखील तेवढ्याच कणखरपणे पुढील काही मिनिटे जरांगे पाटील यांच्या बाजूला बसून राहिल्या हे दृश्य पाहून प्रशासनातील सर्व अधिकारी पोलीस कर्मचारी आणि उपस्थित असणारे शेकडो नागरिक देखील हतबल झाले.
बीड तुळजापूर दिनांक नऊ पुढारी न्युज मराठवाडा प्रतिनिधी