धाराशिव तुळजापूर दिनांक 15 डॉक्टर सतीश महामुनी
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू आहे लक्षणीय काम केल्यानंतर समाज त्याची नोंद घेतो आणि त्याच्या कामाची पावती त्याला देतो हे ज्या व्यक्तिमत्त्वाला लागू पडते त्याचे नाव आहे आनंद उर्फ दादा कंदले.
80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण असे सूत्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेच्या कार्यकर्त्याला घालून दिले. याच विधानाचा उल्लेख काही भाषणांमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी देखील केला. अशाच प्रकारचे सूत्र युवा मोर्चा भाजपाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष आनंद कंदले यांनी अगदी सुरुवातीपासून म्हणजे राजकारणात येण्याअगोदर पासून उपयोगात आणले पुढे त्यांना तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राणा जगजीतसिंह पाटील आणि आजचे भाजपचे तुळजापूर तालुक्याचे आमदार यांची समर्थ साथ लाभली अत्यंत विश्वासाने आणि कौशल्याने राणा दादा यांची साथ आनंद दादा कायम देत आले आहे त्यांना ते नेते म्हणतात त्यांना ते दैवत देखील मानतात.
माझ्या अवलोकनानुसार जेव्हा राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याग करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तेव्हा अनेक कार्यकर्ते राणा दादा यांच्यासोबत येण्यासाठी संभ्रम अवस्थेत होते कमळ या भारतीय जनता पार्टीच्या चिन्हाचे थोडेसे वावगे असल्यासारखे वागत होते. अशा पेच प्रसंगाच्या कालावधीत राणा जगजीत सिंह पाटील यांची साथ आनंददादा कंदले यांनी सोडली नाही आणि ती त्यांनी सार्थ करून दाखवली पुढे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पद त्यांच्याकडे आले. अनेक जुने कार्यकर्ते या पदासाठी इच्छुक होते परंतु आमदार पाटील यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या शांत संयमी स्वभावामुळे त्याचबरोबर संघटनेसाठी आवश्यक काम करण्याची क्षमता असल्यामुळे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पद आनंद दादा यांना अगदी सहजपणे प्राप्त झाले.
तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये अनेक वर्षापासून रुग्ण सेवा समिती कार्यरत आहे तेथे अनेक लोक काम करून बाहेर पडले याच रुग्ण सेवा समितीचे सदस्य म्हणून आनंद कंदले यांनी अत्यंत चांगले काम केले. एखादी छोटी समिती आणि त्या छोट्या समितीच्या सामान्य सदस्य म्हणून असणाऱ्या छोट्या जबाबदारी ला सोबत घेऊन आनंद दादा यांनी कोरोना आपत्कालीन परिस्थिती आणि उपजिल्हा रुग्णालयातील पायाभूत सुविधा त्याचबरोबर तेथे येणाऱ्या रुग्णांच्या सामान्य सुविधा याच्यावर लक्ष केंद्रित केले लहान लहान गोष्टी केल्यानंतर त्याचे महत्त्व सर्वांना पटून जाते असाच प्रघात त्यांनी आपल्या रुग्ण सेवा समितीच्या या कामामध्ये दाखवून दिला आहे. गोरगरीब लोकांना रुग्णसेवेसाठी मदत करणे, ग्रामीण भागातून आलेल्या वंचित घटकाला रुग्णसेवा मिळवून देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि तेथील कर्मचारी यांच्याकडे आग्रह करणे अत्यंत छोट्या कामासाठी लोकांच्या होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आनंद दादा कंदले यांनी या लहानपणावर बसून खूप मोठे काम केले आहे त्याचा उपयोग सामान्य गोरगरीब वंचित घटकाला झालेला आहे त्याच लोकांचे आशीर्वाद देखील त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत समाजकारण आणि राजकारणामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला अशा प्रकारचा सामान्य लोकांचा आशीर्वाद लाखमोलाचा असतो हे त्यांनी ओळखले पारखले आणि त्यानुसार त्यांनी कृती करून संधीचे सोने देखील करून दाखवले.
तुळजापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कामात विशेषता तालुकाध्यक्ष संतोष बोबडे यांच्याट खांद्याला खांदा लावून ते ग्रामीण भागात काम करीत आहेत तुळजापूर शहरांमधून ग्रामीण भागामध्ये लक्ष केंद्रित करणे आजपर्यंत अनेकांना जमले नाही .काहींनी प्रयत्न केला परंतु त्यामध्ये सातत्य ठेवले नाही .मात्र याला अपवाद भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष म्हणून आनंद दादा कंदले यांनी या महत्त्वाच्या कामासाठी आपला वेळ देऊन संघटना बळकट करण्यासाठी सतत पाठपुरावा केला आहे तुळजापूर तालुक्यात तहसील असो अथवा जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथील काम असो या सर्व कामासाठी आनंद कंदले जातीने लक्ष घालतात . आमदार म्हणून आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या कार्यपद्धतीच्या चौकटीमध्ये तंतोतंत बसणारा कार्यकर्ता म्हणून देखील आनंद कंदले यांनी आपले कौशल्य दाखवून दिले आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष सौ अर्चनाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले काम करतात हे देखील पहावयास मिळाले आहेत त्यांच्या सूचना आणि त्यांचे नियोजन याप्रमाणे आनंद दादा कंदले यांनी आज पर्यंत केलेले काम आणि कष्ट निश्चितच त्यांच्या राजकीय जीवनासाठी शिदोरी म्हणून पुढे जाणार आहेत. 1992 पासून आम्ही पत्रकारिता करीत असताना अनेक युवकांना राजकारणामध्ये काम करताना पाहिले आहे अनेकांना मोठी पदे मिळाली आणि ते कार्यकाल संपल्यानंतर पुन्हा आपल्या घरी बसले त्यांनी पुन्हा समाजाची सेवा केली नाही अनेकांना आपल्या नेत्यांनी कायम देत राहावे असेच वाटत असते परंतु यापेक्षा वेगळे आणि स्वतःच्या कर्तुत्वाने काहीतरी उपलब्ध करावी कष्ट करून राजकारणामध्ये काम करून एखादे पद मिळवावे असे वाटणारे खूपच कमी लोक तुळजापूर तालुक्यात सापडतात या तरुण पिढीच्या राजकीय भवितव्याकडे पाहिले की प्रश्न पडतो तालुक्याचे भविष्यातील राजकारण कसे असेल. परंतु ज्याला राजकारणामध्ये येऊन काही काम करायचे आहे त्यांनी आनंद कंदले यांच्याकडे पहावे आणि कोणतेही फारसे राजकीय पाठबळ नसताना कसे काम करावे याचा वस्तू पाठ त्यांच्याकडून घ्यावा आमदार राणा जगदीश सिंह पाटील हे शेकडो कार्यकर्त्यांना सांभाळतात त्यांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या राजकीय जीवनाला वाट करून देण्यासाठी दिशा निर्देश करतात परंतु खूपच कमी लोक असतात जे आनंदाचा कंंदले यांच्याप्रमाणे दिलेल्या संधीचे सोने करण्याच्या अनुषंगाने राजकारणामध्ये काम करतात कष्ट करतात प्रवास करतात लोकांच्या कामासाठी फोन करतात. अशा विश्वासू आणि राजकारणामध्ये भवितव्य असणाऱ्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दैनिक पुढारी परिवार दैनिक न्यूज मराठवाडा परिवार यांच्याकडून मनापासून शुभेच्छा.