एक्झिट पोल मध्ये धाराशिव जिल्ह्याच्या निकालावरून संभ्रम, जिल्ह्यात ओमराजे विजयी होण्याचा समर्थकांना विश्वास.

तुळजापूर दिनांक 2 प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल मध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही जागा दाखवत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यानुसार धाराशिव लोकसभा मतदारसंघांमध्ये ओमराजे निंबाळकर हे शिवसेना उद्धव ठाकरे गट विजयी होणार का असे अंदाज बांधले जात आहेत.

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ .अर्चनाताई पाटील आणि शिवसेना ठाकरे गट पक्षाचे अधिकृत उमेदवार ओम प्रकाश निंबाळकर यांच्यामध्ये चुरशीची अत्यंत कडवी लढत संपन्न झाली आहे मतदान पार पडल्यानंतर कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते अनेक कारणाने धाराशिव लोकसभा मतदारसंघाची ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते. पुढील पाच वर्षांमध्ये या जिल्ह्याचे नेतृत्व आणि जिल्ह्याचा विकास या विषयाच्या अनुषंगाने या निवडणुकीला मोठे महत्त्व आहे. सर्वसाधारणपणे या जिल्ह्याचे नेतृत्व डॉक्टर पद्मश्री पाटील व त्यांच्यानंतर राणाजगजीत सिंह पाटील हे करत आले आहेत. त्यांचे राजकारणातील वर्चस्व लक्षात घेता मागील लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी लाटे मध्ये निवडून आलेले शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हेच यावेळी पुन्हा उमेदवार आहेत यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये राणा जगजीत सिंह पाटील हे स्वतः उमेदवार होते व ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लढलेले होते त्यावेळेस त्यांचा पराभव झालेला होता यावर्षी मात्र काळाने आकस्मितपणे पुन्हा एकदा पाटील परिवारावर उमेदवारी दिल्याचे दिसून आले कारण राणा जगजीत सिंह पाटील हे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत परंतु तडजोड आणि जागा वाटपाच्या व्यवहारांमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देण्यात आली त्यामुळे भाजपाच्या अर्चनाताई पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून त्याने उमेदवारी मिळवलेली होती. उमेदवारी वितरणाचा हा सगळा घटनाक्रम लक्षात घेता आणि त्यांना मिळालेला वेळ लक्षात घेता सर्व बाजूंनी महायुतीची या जिल्ह्यामध्ये महायुतीची होताना दिसून आली. केवळ आमदार पाटील यांचे राजकीय वजन लक्षात घेता त्यांनाही निवडणूक अवघड नाही असे प्रारंभी चित्र होते परंतु जनसंपर्काच्या जोरावर आणि उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या बाजूने असणारी सहानुभूती याच्या जोरावर ओमराजे निंबाळकर यांनी प्रथमपासून मतदानापर्यंत आपली हवा कायम ठेवली होती आणि ती बदलण्यामध्ये महायुतीला फारसे यश आले नाही. लोकांची चर्चा मात्र केवळ आणि केवळ ओम राजे निंबाळकर यांच्या बाजूने आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री पद, सत्ताधारी पक्षाचे सहा आमदार, जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका मध्ये आमदार पाटील यांचे वर्चस्व. नरेंद्र मोदी यांचा चेहरा तसेच भारतीय जनता पार्टीची सहानुभूती, मोदी सरकारने मागील दहा वर्षांमध्ये राबविल्या वेगवेगळ्या लोककल्याणकारी योजनांचे लाभार्थी मतदार बंधू-भगिनी, आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदी सरकारने बजावलेली भूमिका आणि त्यामुळे भारताचे जगामध्ये निर्माण झालेले श्रेष्ठत्व, अजित पवार व राणा जगजीत सिंह पाटील यांचा कायम मतदार, भारतीय जनता पार्टी वसंत परिवाराचा पारंपरिक मतदार या सगळ्या जमेच्या बाजू लक्षात घेता सौ अर्चनाताई पाटील या विजयी होणे अपेक्षित आहे परंतु असे न होता लोकांच्या तोंडामध्ये मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार निंबाळकर यांचेच नाव दिसून आले. दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये ही जागा अजित पवार यांच्या बाजूने दाखवलेली नसल्यामुळे या मतदारसंघात कोण विजयी होणार याकडे लक्ष लागले आहे 4 जून रोजी लागणारा निवडणुकीचा निकाल पुन्हा एकदा ओमराजे यांच्या बाजूने जातो की या जिल्ह्याच्या अनेक वर्ष नेतृत्व करणाऱ्या पाटील घराण्यामध्येच जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *