क्षितिजापार काव्यसंग्रहाचे तुळजापुरात प्रकाशन
तुळजापूर दिनांक 28 डॉ. सतीश महामुनी
आपल्या दिव्यांगपणावर मात करून तुळजापूरच्या लेखिका कांचनगंगा मोरे यांनी लिहिलेल्या कविता अत्यंत दर्जेदार असून समाजातल्या वेगवेगळ्या विषयांची मांडणी त्यांनी आपल्या कविता संग्रहामध्ये केली आहे सर्वांनी हा कवितासंग्रह आवर्जून वाचावा असा आहे असे आवाहन या निमित्ताने मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह दादा गोरे यांनी कवितासंग्रहाच्या विमोचन प्रसंगी केले कार्यक्रमात केलेतुळजापूर तालुक्यातील कांचनगंगा मोरे यांनी लिहिलेल्या क्षितिजापार या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
27 मे 2023 रोजी मराठवाडा साहित्य परिषद शाखा तुळजापूरच्या वतीने कांचनगंगा मोरे लिखित क्षितिजापार या काव्यसंग्रहाचा लोकार्पण सोहळा मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष निवृत्त प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते व मराठवाडा साहित्य परिषद कार्यवाह डॉ. दादा गोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या वेळी कुंडलिक आतकरे व रामचंद्र काळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मसाप शाखा तुळजापूर कार्यवाह श्री विजय देशमुख यांनी केली तसेच कवयित्री कांचनगंगा मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट ओंकार मस्के यांनी केले व आभार प्रदर्शन श्री तुषार सुतरावे सर यांनी केले
यावेळी श्री पंडितराव जगदाळे श्री राजेश शिंदे श्री संदीप गंगणे श्री किरण हंगरगेकर श्री महेश गुरव, श्रीधर मोरे श्री देवेंद्र पवार ज्येष्ठ पत्रकार एटी पोफळे श्री भीमा सुरवसे सर श्री अण्णासाहेब शिरसागर श्री शिवशंकर भारती या मान्यवरांसह शहरातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.