कृष्णा नदीतून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी उजनीमध्ये आणण्यासाठी 20 हजार कोटी रुपयांची योजना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय, आमदार राणा जगजितसिंह पाटील जोरदार स्वागत

मुंबई दिनांक 2 न्यूज मराठवाडा प्रतिनिधी

कोल्हापूर सांगली आणि सातारा या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणाऱ्या तीन जिल्ह्यांमधील पावसाळ्यामध्ये वाहून जाणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रातील पाणी उजनी धरणामध्ये वळवण्याचा महत्त्वकांक्षी मोठा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या सरकारने केला आहे या निर्णयाचे आपण जोरदार स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिले आहे.

पावसाळ्यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो मुसळधार पावसामुळे या तीन जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत होते पुराचे धोके निर्माण होतात मागील पाच सात वर्षांमध्ये कोल्हापूर सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे या संदर्भात राज्य सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी कृष्णा नदीच्या पात्रामधून पावसाळ्यामध्ये समुद्रात जाणारे पाणी उजनी धरणात आणून ते कृष्णा खोऱ्यातील अन्य जिल्ह्यांना देण्याचा निर्णय झालेला आहे या योजनेमधून 50 टीएमसी पाणी उजनी धरणामध्ये आणण्याची योजना आहे सुमारे 20000 कोटी रुपये खर्च या योजनेसाठी येणार आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेच्या सर्वेक्षणासाठी तरतूद करण्यात आली आहे .

लवकरच दुष्काळी असणाऱ्या मराठवाड्यातील उस्मानाबाद बीड जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्याला देखील या पाण्याचा लाभ मिळणार आहे मराठवाड्याच्या हक्काचे 21 टीएमसी पाणी आपण अनेक वर्षापासून मागणी करीत आहोत त्याला राज्य सरकारने देखील मंजुरी दिली आहे

योजना 2003 पासून प्रगतीपथावर आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील कार्य काळामध्ये धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर याच्याच अनुषंगाने महत्त्वाचे विधान केले होते त्याला दुसरा देणारे आणि ज्या भागांमध्ये शेतीला पाणी अद्याप मिळालेले नाही पिण्याच्या पाण्याची दुरावस्था आहे अशा वंचित भागाला हे पाणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे हजारो एकर जमीन ओलिताखाली येण्याची योजनाही असल्यामुळे खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाला पाणी देण्याचा आणि हरितक्रांती करण्याचा हा महत्त्वाचा निर्णय घेतला याची प्रतिक्रिया आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे.

आपण स्वतः जातीने कृष्णा खोऱ्याच्या पाण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला आहे अत्यंत सकारात्मक पद्धतीने सरकारने या प्रश्नाचे हाताळणी केल्यामुळे 50 टीएमसी पाणी उजनी धरणामध्ये येऊ घातले आहे. महाराष्ट्र सरकारच्या इतिहासामध्ये खूप मोठा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली प्रतिक्रिया देताना आमदार राणा जगजितसिंह पाटील म्हणाले. खऱ्या अर्थाने कृषी क्षेत्राला आणि शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका या सरकारने पदभार स्वीकारल्यापासून ठेवली आहे अनेक लहान-मोठे निर्णय या सरकारने तातडीने केल्यामुळे राज्यभरातील शेतकरी देखील या सरकारच्या कामाबद्दल समाधानी आहे असे देखील या निमित्ताने आमदार पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *