चला आपण सचिन पाटील बनू या ? बाजार समितीचे माजी सभापती सचिन पाटील वाढदिवसाच्या निमित्ताने….. सहज

तुळजापूर दिनांक 16 डॉक्टर सतीश महामुनी

तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे यशस्वी माजी सभापती सचिन प्रकाशराव पाटील यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्ताने धाराशिव सोलापूर लातूर पुणे आणि कर्मभूमी तुळजापूर तालुक्यामधून खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना सोशल मीडियावर मध्यरात्री 12 पासून सुरू झाले आहेत. आमच्या देखील त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा कारण एक चांगला राजकारणी एक चांगला बाजार समितीचा सभापती आणि एक चांगला राजकीय कार्यकर्ता व नेता अशी त्यांची ओळख राहिली आहे.

2019 विधानसभा निवडणूक भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राणा जगजीत सिंह पाटील यांची आणि तत्कालीन विद्यमान आमदार व माजी मंत्री मधुकरराव चव्हाण या दोघांमध्ये कडवी लढत झाली. या निवडणुकीत महेंद्र धरगुडे आणि अशोक जगदाळे यांनी देखील आपले नशीब आजमावले. ही निवडणूक तुळजापूर तालुक्याच्या राजकीय वातावरणाला बदलणारी निवडणूक ठरली यामध्ये राणा जगजीत सिंह पाटील विजयी झाले, या काळात तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणामध्ये मोठे बदल झाले या राणा पाटील यांच्या विजयामध्ये सचिन पाटील यांचा मोठा वाटा आहे. अनेक वर्ष काँग्रेसच्या विशेषता मधुकरराव चव्हाण यांच्या अत्यंत जवळ राहून तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये सचिन पाटील यांनी आपले व्यक्तिगत स्थान निर्माण केलेले होते व आहे. राजकारणामध्ये पक्ष बदल केल्यानंतर या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि राजकीय पार्श्वभूमीचा तसेच काँग्रेसमध्ये राहून ज्यांच्याशी मैत्री केली त्या सर्व मित्रांचा 2019 च्या निवडणुकीमध्ये खूप चांगला फायदा राणा जगजित पाटील यांना झाला, हा फायदा नेमका कसा झाला याच्या विस्तारामध्ये न जाता ही निवडणूक सचिन पाटील यांनी राहणार जगजीत सिंह पाटील यांना सोपी करण्यासाठी सहकार्य केले एवढे आज म्हटले तरी ज्याला राजकारणाची जाण आहे त्यांना सर्व काही समजून जाईल आज ते समजून सांगण्याची वेळ नाही परंतु राजकारणामध्ये एखादा कार्यकर्ता काय करू शकतो हे सचिन पाटील यांनी या निवडणुकीत दाखवून दिले. आज त्यांच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने ही आठवण करून देणे माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराचे काम आहे.

तुळजापूर नगर परिषदेचे नगरसेवक म्हणून देखील त्यांनी काम केले आहे . शहराच्या राजकारणामध्ये देखील त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून आपले स्वतंत्र स्थान नगरपरिषदेच्या कामकाजामध्ये दाखवून दिलेले आहे. प्रस्थापित राजकारण आणि आपले राजकारण याच्यामध्ये अंतर ठेवून काम करणारा हा कार्यकर्ता सदैव सर्वांनाच हसतमुख दिसतो तेव्हा तो सर्वांनाच आपला वाटतो म्हणून अनेक तरुण कार्यकर्ते त्यांच्यासोबत जोडले गेले आहेत आणि ते अत्यंत निष्ठेने त्यांच्यासोबत काम करत आहेत. आमदार राणा जगजित पाटील यांचा शब्द प्रमाण समजून सचिन पाटील यांनी या काळात काम केलेले आहे आणि अत्यंत विश्वासू नेता म्हणून आपली ओळख प्रस्थापित केली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर या बाजार समितीमध्ये दोन वेळा सभापती होण्याचा मान सचिन पाटील यांना मिळाला. दोन्ही वेळेस त्यांनी चांगले निर्णय घेतले बाजार समितीला आकार दिला बाजार समितीचे वर्तुळ मोठी केले. बाजार समितीमध्ये विकासाचे प्रकल्प म्हणजे मार्केट यार्ड विस्तार, येथील शॉपिंग सेंटरची निर्मिती, व्यापाऱ्याच्या सोयीसुविधा, आणि शेतकऱ्यांना विश्वास देणारा बाजार अशा मुद्द्यावर सचिन पाटील यांनी काम केले आणि आपले काम शेतकरी आणि कृषी क्षेत्रामध्ये लोकप्रिय बनवले. एक चांगला सभापती अशी त्यांची प्रतिमा बाजार समितीच्या संपूर्ण वर्तुळामध्ये आहे त्याचे प्रतिबिंब तुळजापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये आपण पाहतो आहोत. एक साधा कार्यकर्ता अत्यंत शांत स्वभाव अत्यंत सरळ भाषा त्याचबरोबर सर्वांना सोबत घेणारा राजकीय स्वभाव, याच साधेपणाने त्यांनी सर्वांना जिंकले आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना सर्वजण शुभेच्छा देताना दिसतात या शुभेच्छा देण्याचे प्रमाण देखील खूप मोठा आहे अधोरेखित करण्यासारखा आहे राजकारणामध्ये वावरणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आरसा दाखवणार आहे.

हा वाढदिवस पुन्हा एकदा निवडणुकीच्या वातावरणात आला आहे आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहिते सोबत विधानसभा निवडणुकीचे पडघम सुरू झाले आहेत यावर्षी होणारा हा वाढदिवस पुन्हा एकदा तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये सचिन पाटील यांची भूमिका सांगणारा आहे, वेळ तीच आहे काळ तोच आहे टाइमिंग तेच आहे आता मात्र सचिन पाटील यांची भूमिका 2019 पेक्षा अत्यंत महत्त्वाचे आहे त्यांच्याकडे सर्वांचेच बारकाईने लक्ष आहे. आमदार राणा जगजित पाटील यांचा महत्त्वाचा कार्यकर्ता नेता अशी त्यांची असणारी ओळख पुन्हा एकदा या निवडणुकीत कामाला येणार आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभकामना आशीर्वाद तुळजाभवानी देवीचा शुभेच्छा मित्रपरिवाराच्या….

प्रतिक्रिया

तुळजापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी त्यांच्यासोबत काम करतो काम करताना मिळणारा आनंद खूप निखळ आहे प्रामाणिक आहे आणि नेता कसा असावा याबाबत सचिन पाटील यांचे नियोजन आणि सामान्य कार्यकर्त्या सोबत असणारा व्यवहार सर्व काही सांगून जातो – सागर पारडे भाजप युवा नेता तुळजापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *