काटी दि 9 उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शनिवार दि. 9 रोजी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ व जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्याच्या पार्श्वभूमीवर या घटनेच्या निषेधार्थ आज शनिवारी तुळजापूर तालुक्यातील काटी गाव बंदची हाक देण्यात आली.
यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे संपूर्ण गाव बंद करुन व टायर जाळून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत राज्य सरकारच्या निषेधार्थ गाव बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संपूर्ण गाव कडकडीत बंद ठेवून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले त्यास येथील सकल मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळाला. या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
जालन्यातील लाठीचार्ज घटना निषेधार्ह
–प्रदीप साळुंके
यावेळी बोलताना प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके म्हणाले की,राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने लाखोंच्या संख्येचे 56 मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्चांची दखल जगाने घेतली. पण आपल्या येथील राज्यकर्त्यांनी जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत. तसेच सध्याच्या राज्य सरकारने मराठा समाजासाठी तात्काळ आरक्षण जाहीर करावे व संबधित पोलीस अधिकार्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली.
काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशीलकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या आंदोलनात प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके, प्रकाश गाटे, वसंत हेडे, चेअरमन संजय साळुंके, गजानन देशमुख, रणजित देशमुख,धनाजी गायकवाड, सुहास साळुंके, राहुल गायकवाड,सचिन साळुंके,अमोल देशमुख, सतिश देशमुख,स्वप्निल सावंत,हेमंत गवंदारे,निवृत्ती गाटे, गणेश गाटे,शुभम काटे, सुरज गायकवाड ,अमोल देशमुख, शाम चव्हाण, विक्रम खपाले, देवव्रत खपाले, कृष्णा पाटील,गोपाळ चिवरे,अविनाश देशमुख,संग्राम हंगरकर,धनाजी देशमुख, अजित हंगरकर,टीप्पू जाधव, संताजी भापकर,आकाश सुळे, स्वप्निल गाटे ,लखन देशमुख, प्रविण गाटे,अमर देशमुख, नितीन गवळी, गजानन चीवरे, आबासाहेब रोडे, अजित रोडे, समर्थ रोडे, संजय अंधारे, योगेश अंधारे, पृथ्वीराज देवकर, आदित्य काटे, महेश गाजरे, सुदर्शन गाटे आदींसह सर्व पक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते.