तुळजापूर दि 17 पुढारी वृत्त सेवा
अमृत महोत्सवी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय, मसला (खुर्द) येथे ध्वजारोहण करण्यात आले अमृत महोत्सवी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत गावामध्ये विविध उपक्रम कार्यक्रम घेण्यात आले.
यामध्ये जिल्हा परिषद शाळेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा पेन वही देऊन सत्कार करण्यात आला. मसला (खुर्द) सज्जा चे नवनिर्वाचित तलाठी श्री. शिंदे साहेब यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या हस्ते वृक्ष लागवड आणि जिल्हा परिषद शाळेतील प्रयोगशाळेची पाहणी करण्यात आली.
मसला (खुर्द) जिल्हा परिषद शाळेची धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वोत्कृष्ट शाळा “स्मार्ट स्कूल” म्हणून नामांकन झाल्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने मुख्याध्यापक श्री.घंदुरे सर यांचा देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच श्री.रामेश्वर वैद्य, ग्रामपंचायत सदस्य श्री.दयानंद शिंदे, शालेय कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण नरवडे व सदस्य लक्ष्मण वडवराव, सर्व शिक्षक आणि इतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका व गावातील नागरिक उपस्थित होते.
”मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन चिरायू होवो”
तुळजापूर दि 17 प्रतिनिधी