तुळजापूर दि 22 प्रतिनिधी
तुळजापुरात महालक्ष्मी सणाच्या निमित्ताने घरोघर देखावे करण्यात येत आहेत यावर्षी चांद्रयान 2023 च्या यशस्वी कामगिरीवर आधारित देखावे मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहेत येथील माजी नगरसेवक देविदास साळुंखे यांच्या कुटुंबीयांनी महालक्ष्मीच्या समोर चांद्रयान या यशस्वी प्रक्षेपणा वर आधारित सुंदर देखावा उभारला आहे मोठ्या संख्येने मित्रपरिवार आणि तुळजापुरातील नागरिक हा देखावा पाहण्यासाठी माजी नगरसेवक देविदास साळुंखे यांच्या निवासस्थानी भेटी देत आहेत.
भारतीय तंत्रज्ञानाचा चांद्रयान 2023 यशस्वी कामगिरीनंतर जगभरामध्ये डंका वाजला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे जगभरातून अभिनंदन झाले स्पेस सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आगामी काळामध्ये संशोधक काम करणार आहेत भारती यामध्ये आघाडीवर असणार आहे यासाठी भारताने चंद्रावरील केलेली कामगिरी यावर्षी गणेशोत्सव आणि महालक्ष्मी सणाच्या निमित्ताने करण्यात येणाऱ्या देखावा मध्ये याच विषयाला महत्त्व दिले गेले आहे माजी नगरसेवक देविदास साळुंखे हे दरवर्षी आपल्या महालक्ष्मी सणाच्या निमित्ताने विविध सामाजिक विषयावर देखावे सादर करतात त्यांनी यावर्षी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चांद्रयान 2023 याची प्रतिकृती साक्षात उभी केली आहे जमिनीवर ढग देखील उतरलेले दिसतात आकाशामधील चित्र उभे करण्यात आले आहे भारताचे उत्तुंग कामगिरी आणि या कामगिरीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेले पाठबळ या देखावा मध्ये मांडले गेले आहे