तुळजापूरात हिंंदी गाण्यांचे बादशाह महंम्मद रफी यांच्या गाण्याची सुरेल मैफिल

मंहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने स्वरयात्रीची प्रस्तुती

तुळजापूर दि 26 न्यूज मराठवाडा प्रतिनिधी

हिंदी सिनेमा मध्ये ज्यांनी आपल्या मधुर आवाजाने संपूर्ण कारकीर्द गाजवली आणि भारताच्या कानाकोपऱ्यात आपला लौकिक प्रस्थापित केला असे गायक महंम्मद रफी यांच्या मराठी आणि हिंदी गाण्यांचा कार्यक्रम तुळजापूर येथील स्थानिक कलाकारांनी स्वर यात्री यांच्या वतीने आयोजित केला आहे रसिक श्रोत्यांनी कार्यक्रमासाठी 30 जुलै 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

स्वर यात्री संस्थेच्या वतीने तुळजापूर येथे मंगळवार पेठ नगरपरिषदेच्या बाजूस जाधव कॉम्प्लेक्स मधील ए आय टी क्लासेस हॉल दुसरा मजला येथे आयोजित केला आहे. ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी च्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नवीन तंत्रज्ञानाचा वापर या कार्यक्रमात होत आहे कराओके ट्रॅक वर स्वरयात्री संस्थेचे कलाकार मोहम्मद रफी साहेब यांचे श्रवणीय व लोकप्रिय गाणी सादर करणार आहेत. रसिक श्रोत्यांना खूप चांगला अनुभव देणार हा कार्यक्रम असून या कार्यक्रमाचे शीर्षक शोधीशी मानवा राउळी मंदिरी….. असे ठेवण्यात आले आहे 30 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता सर्व रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे.

यापूर्वी एक महिन्यापासून येथील स्थानिक कलाकार या कार्यक्रमाची तयारी करीत आहेत. आपल्याच अवतीभोवती असणाऱ्या स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि कला सादरीकरणाचे कौतुक करण्यासाठी आपण सर्व रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे यामधून स्थानिक सांस्कृतिक चळवळ वाढण्यासाठी आपले पाठबळ लागणार आहे. रफी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने स्थानिक कलाकारांची ही पुष्पांजली त्यांच्या स्मृतीसमोर अर्पण करण्यात येत आहे. मराठी आणि हिंदी गाण्यांचा खूप मोठा खजाना आणि मोठा इतिहास ज्या रफी साहेबांनी आपला साठी ठेवला आहे त्यांच्यासाठी हा श्रद्धांजली कार्यक्रम तुळजापुरात होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *