तुळजापूर दि २७ प्रतिनिधी
“#एकआरतीबंधुत्वाची” दिनांक 27/09/2023
आजचे #यजमान श्री शिवमूर्ती शिवाजीराव साठे व श्री ओमप्रकाशजी खंडेलवाल यांच्या हस्ते #श्रीचीआरती संपन्न झाली आपल्याला माहीतच आहे की, आमच्या मंडळाने समाजातील #दुर्लक्षित व्यक्तींना ( यजमानांना ) महारतीस बोलावण्याची #नवीनप्रथा सुरू केली आहे.
यजमाना बद्दल सांगायचे म्हणजे श्री शिवमूर्ती हे मूळचे #काक्रंबा ता. तुळजापुरचे रहिवाशी असून ते #जगाचेपोशिंदे आहेत म्हणजेच ते #शेतकरी आहेत. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले जेमतेम 4 थी पर्यंत शिक्षण परंतु त्यांनी आपल्या मुलाला व मुलीला #BSC अग्री पर्यंतचे शिक्षण दिले. खरेच यांचे #स्वतःशिक्षितनसूनही ते आपल्या मुलांना उत्तम प्रकारे #शिक्षण दिले . एवढेच नाही तर त्यांचा #वडीलोपर्जित शेती #व्यवसाय आहे आज तागायात वयाच्या 60 वर्षापर्यंत ते शेतीच करतात. परंतु त्यांनी 2017 पासून #गोआधारितनैसर्गिकशेती ( #सेंद्रियशेती ) करण्याचा #संकल्प केला आणि स्वतःच्या शेतामध्ये हंगामी #भाज्या, #वेलवर्गीयभाज्या, #कंद तसेच सहजिवणासाठी #फुलझाडे लावतात. त्याच बरोबर ते सेंद्रिय शेतीसाठी इतर शेतकरी बंधूनांना #प्रोत्साहित करतात. म्हणूनच त्यांना सर्वजण #कृषीमित्र म्हणतात.
पुढे ते म्हणाले की, बाजारातून जर सेंद्रिय मालाला मागणी वाढल्यास इतर शेतकरी ही सेंद्रिय शेती कडे वळतील ज्यामुळे समाजाला #आरोग्यदायी शेतीमाल मिळेल. ते “#राजुभाईदीक्षित” या पुरस्काराने ते सन्मानित आहे. कदाचित ते शिक्षित नसतील ही परंतु ते #सुशिक्षीत आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
दुसरे यजमान म्हणजे श्री ओमप्रकाशजी ते मूळचे #अहमदनगरचे परंतु मागील 42 वर्षापासून ते तुळजापूर शहरामध्ये त्यांचे वास्तव्य, 1980 ला #मेडिकल क्षेत्रात पदार्पण केले. यांचे वैशिष्ठ म्हणजे कोणत्याही #पेशंटला कधी ही – कोणत्या ही वेळेत औषध मिळण्याचे ठिकाण म्हणजे ओम मेडिकल. डॉक्टरने चिठ्ठी लिहून द्यायचे त्या बरोबर त्यांच्या #घराचापत्ता ही सांगायचा …. मग काय होणार तो पेशंट त्यांच्या घरी … दार वाजवायला आलाच…. परंतु #कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी कधी ही त्या पेशंटला परत पाठवले नाही विशेष म्हणजे त्यांचे मेडिकलचे दुकान आणि घर या मध्ये खूप अंतर असून ही. नंतर त्यांनी 1993 पासून कमान वेस येथे मेडिकल आणि घर एकच केले आणि ते सेवाही तशीच चालू ठेवली आज पर्यंत. परंतु त्यांनी एक #खेद #व्यक्त केला की, मी ही सेवा कोणाचे तरी #प्राण वाचतील या #उद्देशाने करतो परंतु बरेच लोक हे डोके दुःखी, अंगदुखी, यासारख्या #किरकोळ #गोळ्याऔषधासाठी #बेरात्री उठवतात वरून पैसे सुट्टे अनात नाहीत त्यामुळे त्यांना #हकनाकत्रास सहन करावा लागतो, #राग येतो, हे करतो ते चुकीचे की काय असे ही त्यांना वाटते. परंतु तो राग मनात ना ठेवता ते पुन्हा आलेल्या पेशंटला #गोळ्या_औषधे देतात. कदाचित हा त्यांच्या स्वभावाचा भाग बनला असावा म्हणूनच की काय हे कार्य ते राग आला तरी करतात. पुढे ते म्हणाले की, व्यवसाय क्षेत्रातमध्ये मीच एकटा राहिलो आहे, आमच्या कुटुंबातील बाकी सर्वजण हे नोकरी क्षेत्रात आहेत.
त्यांना एक मुलगा आहे ते परभणी येथे #MDS डॉक्टर आहेत, त्यांच्या #सूनबाई ही #MDS डॉक्टर आहेत. अश्या #व्यक्तींचा #सन्मान करून आमच्या मंडळाने त्यांच्या कार्याची माहीती समाजापुढे मांडण्याचा #प्रयत्न केला, आपल्याला ही तो आवडला असेलच. तर मग आपण ही या ” एक आरती बंधुत्वाची” या #संकल्पनेची सुरुवात करावी हीच आमच्या मंडळाकडून विनंती. समर्थ गणेश मंडळ, समर्थ नगर, तुळजापूर खुर्द रोड, तुळजापूर , जिल्हा – धाराशिव
9822080409