तुळजाभवानीच्या अभिषेक पावतीची रक्कम 50 रुपये ठेवण्याची मागणी
तुळजापूर दिनांक 10 डाॅ. सतीश महामुनी
तुळजाभवानी देवीच्या अभिषेक पूजेसाठी 500 रुपयाची पावती रद्द करून 50 रुपये करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्याकडे माजी नगराध्यक्ष सचिव रोजकरी यांच्या शिष्टमंडळाने केली आहे.
जिल्हाधिकारी व तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर सचिन ओंबासे यांना दिलेल्या निवेदनामध्ये विविध मागण्या करण्यात आलेले आहेत . यामध्ये तुळजाभवानी देवीच्या अभिषेक पूजेसाठी पाचशे रुपयाचा पास ऐवजी पन्नास रुपयांचा पास करण्यात यावा. तोळ भैरवाच्या मंदिरासमोर असणारा दरवाजा पुन्हा चालू करण्यात यावा काही तांत्रिक कारणाने तो बंद आहे. त्याला सुरू केल्यास त्या दरवाजाचा भाविक भक्तांना चांगला उपयोग होणार आहे. नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक एक दोन आणि तीन साठी तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या निधीमधून 6 कोटी रुपयांचा विकास निधी देण्यात यावा अशा प्रमुख मागण्या या निवेदनामध्ये करण्यात आलेले आहेत. माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी नगरसेवक पंडित जगदाळे, किशोर साठे, औदुंबर कदम या नगरपरिषद पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे.