पत्रकार ते उपसंपादक………अनिल आगलावे यांची जिद्दी कारकीर्द……

आज वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव

तुळजापूर दिनांक 8 डॉक्टर सतीश महामुनी

तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आणि तुळजापूर येथील दैनिक सामनाचे प्रतिनिधी पत्रकार अनिल आगलावे यांचा आज वाढदिवस आहे एका जिद्दी पत्रकाराचा हा वाढदिवस सर्वजण सकाळपासून साजरा करत आहेत. सर्वप्रथम माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथील रहिवासी आणि येथे मागील अनेक वर्षापासून साजरा होणाऱ्या हिरकणी महोत्सवाचे संयोजक अनिल आगलावे यांनी सुरुवातीपासून खडतर परिश्रम करत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कुटुंब चालवत शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले शिवाजी विद्यापीठामधून मास्टर ऑफ जर्नालिजम ही पत्रकारितेतील पदवी प्राप्त केली त्यानंतर धाराशिव येथे दैनिक एकमत जिल्हा कार्यालयात सहसंपादक म्हणून अनेक वर्ष काम केलं या सर्व अनुभवी पत्रकारितेच्या कामाबरोबर त्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आमदार संवाद मंच या युनिसेफ अंतर्गत चालणाऱ्या एनजीओ कामासाठी त्यांनी धाराशिव जिल्ह्याचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली त्यांच्याच नेतृत्वाखाली तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी आणि खोताचीवाडी या दोन गावांमध्ये जलसंधारण आणि वृक्षारोपण तसेच समृद्ध बसवंतवाडी असे प्रकल्प राबविण्यात आले.

अलीकडच्या काळात त्यांनी तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष म्हणून चांगले काम केले यादरम्यान त्यांनी दैनिक सामना तुळजापूर तालुका प्रतिनिधी म्हणून काम केले त्यांच्या कामाची दखल घेऊन आणि त्यांच्यातील जिद्दी पत्रकारितेचा स्वभाव लक्षात घेऊन त्यांनी अल्प कालावधीत पुणे येथील दैनिक सामनाच्या मुख्य कार्यालयात उप संपादक म्हणून जबाबदारी स्वीकारली पत्रकार दिनाच्या धावपळीच्या काळामध्ये त्यांनी मिळवलेले हे यश खूप कौतुकास्पद आहे आणि तेवढेच अभिनंदन आज पात्र देखील आहे.

तुळजापूरची काही तरुण मंडळी पुण्याच्या पत्रकारितेमध्ये आज आपले नाव निर्माण करीत आहेत हे तरुण पत्रकार तुळजापूर तालुक्याचे भूषण आहेत धाराशिव जिल्ह्याचे भूषण आहेत कारण ते पुण्यासारख्या प्रगत शहरांमध्ये आणि मान्यवर पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपले योगदान देण्यासाठी पुढे आले आहेत जमिनीवर केलेली पत्रकारिता त्यांच्या खूप उपयोगाला येते आहे असे त्यांचे आजचे लिखाण पाहिल्यानंतर सहजपणे लक्षात येते मातीची पत्रकारिता आणि ग्रामीण तळागाळाच्या प्रश्नासाठी उपयोगात आणलेली पत्रकारिता आज दैनिक सामना आणि इतर दैनिकाच्या संपादकीय डिस्कवर येथील अनुभवाचा उपयोग करीत आहेत खूप चांगले विषय मांडणे हा अनिल आगलावे यांची आवड आहे.

खूप चांगल्या पद्धतीने पत्रकारितेमध्ये आपलं नाव निर्माण करणाऱ्या अनिल आम्हा सर्व पत्रकारांच्या वतीने खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा आरळी बुद्रुक संपूर्ण गाव त्यांचे जेवढे कौतुक करते तेवढेच कौतुक त्यांचे तुळजापूर शहरांमध्ये देखील झालेले आहे होते आहे धाराशिव जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे सर्व बाजूंनी आज त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होतो आहे शुभेच्छा दिल्या जात आहेत आपण अशीच प्रगती करावी आणि असेच जिल्ह्याचे नाव राज्याच्या पत्रकारितेमध्ये प्रस्थापित करावे अशी देखील आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो !

स्नेहांकित
डॉ. सतीश महामुनी,
अध्यक्ष तुळजापूर तालुका पत्रकार संघ
व सर्व पत्रकार बांधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *