तुळजापूर दि 31 वृत्त सेवा
मराठा आरक्षणाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा आरक्षणाचे समर्थक आंदोलन करीत असून तुळजापूर तालुक्यातील बिजनवाडी येथे शेकडो तरुणांनी गावामध्ये कॅन्डल मार्च काढून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला आहे. बिजनवाडी येथील तरुण महिला विद्यार्थी आणि गावकरी यांनी एकत्रित मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ कार्यक्रम केला याप्रसंगी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा देखील निर्णय जाहीर करण्यात आला.
मराठा आंदोलनाच्या बिजनवाडी येथील कार्यक्रमाचे नेतृत्व माऊली शिंदे, विजय निचळ, सोपान निकम, दत्ता नावडे, महादेव नावडे, सुनील निचळ, ज्योतीराम काळदाते, किशोर नावडे, अशोक लांडगे, नितिन नावडे यांच्यासह इतर विद्यार्थ्यांनी महिलांनी केले खूप मोठ्या संख्येने गावातील लोकांनी कॅण्डल मार्चमध्ये सहभाग घेतला संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी सर्वांनी प्रार्थना केली.
मराठा समाजाच्या भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी आरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रामीण भागातील मराठा समाजाची अवस्था पाहिल्यानंतर प्रत्यक्षदर्शी अहवाल लक्षात घेऊन सरकारने तातडीने आरक्षण दिले पाहिजे संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा आंदोलनाचे वादळ महाराष्ट्रात उठलेले आहे बिजनवाडी सह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ग्रामीण भागात आंदोलन उभे राहिलेले आहे याची दखल सरकारने पातळी घेतली पाहिजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून मराठा समाजाला तातडीने आरक्षण दिले गेले पाहिजे अशी भूमिका भिजून वाडी येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.