तुळजापूर दि ५ सतीश महामुनी
तुळजाभवानी माते मराठा समाजाला आरक्षण देण्याची सुबुद्धी या सरकारला लवकरात लवकर दे मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक वर्षापासून संघर्ष करीत आहे आपण सुरू केलेला हा आरक्षणाचा संघर्ष आरक्षण हाती मिळाल्यानंतरच संपेल असे प्रतिपादन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी तुळजापूर येथे केले.
बीड जिल्ह्यातून निघालेली मनोज जरांगे पाटील यांची संघर्ष यात्रा 5 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या नगरीत आली येथे सर्वप्रथम जिल्हाध्यक्ष महेश गवळी यांनी संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांचे जिल्ह्याच्या वतीने स्वागत केले. त्यांच्यासमवेत मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि इतर संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वश्री सज्जन राव साळुंखे आबासाहेब कापसे महेश गवळी अण्णासाहेब शिरसागर पुजारी कुमार टोले महेश चोपदार गणेश नन्नवरे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि मराठा आरक्षण चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते तुळजाभवानी मंदिर कार्यालयाच्या समोर उभारलेल्या व्यासपीठावरून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले देवीचे पुजारी कुमार टोले यांनी त्यांची पूजा केली आणि त्यांना आशीर्वाद दिला. त्यानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने तहसीलदार सोमनाथ माळी यांनी तुळजाभवानीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला.
तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्रामध्ये आज आपण आल्यानंतर आणि देवीचे दर्शन घेतल्यानंतर मनाला आनंद झाला आहे सांगून संघर्ष योद्धा मनोज पाटील यांनी आरक्षणाच्या या लढाईमध्ये आपण अनेक वर्षापासून काम करत आहोत राज्य आणि केंद्र सरकारने आरक्षणाच्या या लढाईमध्ये योग्य भूमिका मांडून तातडीने मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे आणि आम्ही ते घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असे सांगून त्यांनी मराठा समाज हा खूप वर्षापासून अन्याय सहन करत आला आहे. मराठा समाजाला आरक्षण अत्यंत गरजेचे आहे सरकारने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे आणि या संघर्षाच्या काळात मराठा समाजाने माझ्या पाठीशी उभे राहून जे माझे पाठबळ वाढवलेले आहे त्यामुळे माझी जबाबदारी अधिक वाढलेली आहे येणाऱ्या काळात हा संघर्ष असाच सुरू राहील जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण हातामध्ये मिळणार नाही.
याच तुळजाभवानी देवीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना आशीर्वाद दिला आणि महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आज तिच्यासमोर नतमस्तक झाल्यानंतर मला तुळजाभवानी देवीकडे साकडे घालावे वाटले म्हणून मी घातले आहेत आई तुळजाभवानी या सरकारला सुबुद्धी दे आणि मराठा समाजाला तातडीने आरक्षण लागू कर. असे मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले. तुळजापूर शहरात आगमन झाल्यापासून मनोज जरांगे पाटील यांचा जयजयकार सुरू होता, चौका चौकामध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले आणि जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देखील देण्यात आल्या.
तुळजापूर शहर आणि ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने तरुण या यात्रेमध्ये सहभागी झाले होते तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी येथील तरुण आरक्षण चळवळीतील कार्यकर्त्यांशी चर्चा दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आले आणि त्यांनी पुतळ्यास अभिवादन केले.