तुळजापूर दिनांक १५ डॉ. सतीश महामुनी
सुमारे तीस वर्षापासून तुळजापुरात भारतीय जनता पार्टी कामात आहे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यामुळे महायुतीला खूप मोठे बळ प्राप्त झालेले आहे, या निवडणुकीमध्ये महायुतीचा पारंपारिक मतदार मोठ्या विश्वासाने महायुतीला मतदान करून राणा दादा यांचा मोठा विजय साजरा करणार आहे असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व सावरकर विचाराचे अभ्यासक बाळासाहेब शामराज यांनी व्यक्त केला. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुरू असलेल्या घडामोडीवर भाष्य करताना त्यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघ राणा दादा यांच्यामुळे भाजपचा बालेकिल्ला झाला आहे अशा शब्दात राणा दादा यच्या कामाचे कौतुक केले.
तुळजापूर शहर ज्या काळात शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता अशा बिकट परिस्थितीमध्ये बोटावर मोजण्या एवढ्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा तुळजापुरात फडकवला तो कायम लहान मोठ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने डौलत राहिला. या जिल्ह्याचे नेते राणा जगजीत सिंह पाटील यांनी भारतीय जनता पार्टी दाखल झाल्यापासून या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सत्तेतील राजकारण यशस्वी झाले आहे. यापूर्वी युतीच्या माध्यमातून अनेक वेळा लोकसभा आणि विधानसभेमध्ये या जिल्ह्यांमध्ये यश मिळवलेलेच आहे. बदलत्या राजकारणाच्या परिस्थितीमध्ये राणा दादा यांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतील सर्व घटक पक्ष यांना सोबत घेऊन एक संघटित निवडणूक प्रक्रिया चालवली आहे त्याचा परिणाम या विधानसभा निवडणुकीमध्ये दिसतो आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे अनेक नेत्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्ष पुढे नेला आज नरेंद्र मोदी आणि राज्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे यशाची सर्व शिखरे पक्षानं पार केली आहेत पहावे तिकडे भारतीय जनता पार्टी यश प्राप्त करताना दिसते आहे या यशाच्या मागे पक्षाचे धोरण आणि नरेंद्र मोदी यांनी भारताला दिलेला नव विचार यामुळे लोकांचा विश्वास दड झाला तो कमळ या चिन्हाच्या भोवती आज अधोरेखित झाला आहे आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांच्या कामाची पद्धत आणि त्यांचा मूळ स्वभाव हे सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीच अत्यंत मिळते जुळते आहे परिणामी सर्व नवे जुने असे कार्यकर्ते पदाधिकारी नेते एक दिलाने काम करत आहेत आगामी काळामध्ये अशाच प्रकारची भक्कम महायुती जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि ग्रामपंचायतीसाठी देखील यशस्वी होणार आहे कारण राज्य आणि केंद्र दोन्हीकडे भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळे जनतेचा कल जनमत भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे अनेक आव्हाने असताना देखील पक्षाने आणि जनतेने ही सर्व आव्हाने पार करून आपली किमया करून दाखवली आहे यामध्ये आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांनी बजावलेली भूमिका धाराशिव जिल्ह्यातील महायुतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे त्याच जोरावर लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीची देखील पूर्ण तयारी केली म्हणून आज आपणास हे विधानसभा निवडणुकीचे यश पाहावयास मिळते आहे असे या निमित्ताने ज्येष्ठ नेते बाळासाहेब शामराज म्हणाले. तुळजापूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये कार्यकर्त्यांचे खूप चांगले जाळे आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांनी निर्माण केलेल्या आहे हा अभेद किल्ला विरोधकाला भेद नाही शक्य नाही हे वेळोवेळी आणि जागोजागी स्पष्टपणे दिसते आहे त्यामुळे 23 तारखेला गुलाल राणा जगजीत सिंह पाटील यांचा उधळला जाणार आहे असेही त्यांनी या निमित्ताने विश्वासाने सांगितले.