भालचन्द्र कुलकर्णी यांना ” काव्यमाधुर्य “पुरस्कार जाहीर

करम प्रतिष्ठानचा डॉ. शंतनू चिंधडे स्मृती काव्यमाधुर्य पुरस्कार भालचंद्र कुलकर्णी यांना जाहीर

पुणे : करम प्रतिष्ठानतर्फे स्व. डॉ. शंतनू चिंधडे स्मृतीप्रीत्यिर्थ दिल्या जाणाऱ्या काव्यमाधुर्य पुरस्काराने कवी भालचंद्र कुलकर्णी यांचा गौरव गेला जाणार आहे. कार्यक्रम शनिवार, दि. 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला येथे आयोजित करण्यात आला आहे.

पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ कवयित्री, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह मृणालिनी कानिटकर यांच्या हस्ते होणार असून मीनल चिंधडे, स्मिता जोशी-जोहरे, चंचल काळे यांची विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, प्रज्ञा महाजन यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‌‘प्रीतरागिणी‌’ निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आल असून यात अपर्णा डोळे, डॉ. दाक्षायणी पंडित, डॉ. मंदार खरे, सुजाता पवार, वैशाली माळी, चैतन्य दीक्षित, अमिता पैठणकर, योगिनी जोशी, उल्का खळदकर, माधुरी डोंगळीकर यांचा सहभाग असणार आहे, असे कार्यक्रमाच्या निमंत्रक वर्षा कुलकर्णी यांनी सांगितले.

फोटो : भालचंद्र कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *