मराठा समाजातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाचा कॉम्प्युटर कोर्स मोफत, 10 वी पास व 18 वर्षे पूर्ण असणाऱ्या तरुणांनी प्रवेश घेण्याचे आवाहन

तुळजापूर दि 7 प्रतिनिधी

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीस सन 2023-24 या वर्षांमध्ये मराठा, कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण द्यावयाचे आहे. अशा विद्यार्थ्यांनी तातडीने तुळजापूर येथील जनता बँकेच्या पाठीमागे असणाऱ्या समर्थ कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्रामध्ये संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे


या प्रशिक्षणात एकूण चार कोर्सेस मोफत शिकवले जाणार आहेत
1.इंग्लिश कमुनिकेशन स्किल्स
2.बेसिक IT स्किल्स
3.प्रोफेशनल स्किल्स
4.Advance स्किल्स
तेव्हा आपण आजच श्री समर्थ कॉम्प्युटर्स तुळजापूर येथे १) दहावी चा मार्क मेमो झेरॉक्स २) टी.सी झेरॉक्स ३) आधार कार्ड ४) रहिवासी प्रमाणपत्र 5 ) उत्पन्नाचा दाखला ६) फोटो या कागदपत्रा सह येऊन प्रवेश घ्यावा मर्यादित प्रवेश आहेत. तुळजापुरात प्रशिक्षण देणारी संस्था
श्री समर्थ कॉम्प्युटर्स, गोपाळ नगर, नळदुर्ग रोड,
तुळजापूर मोबाईल वरून संपर्क साधण्यासाठी 9975596190 या क्रमांकावर कॉल करावा.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुती सरकारची महत्त्वकांक्षी योजना असणारी मराठा विद्यार्थी आणि कुणबी मराठा विद्यार्थी यांना वेगवेगळे व्यवसायिक स्किल आणि ज्ञान देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने या कोर्सला लॉन्च केले आहे तुळजापूर येथील जनता बँकेच्या पाठीमागे असणाऱ्या समर्थ कॉम्प्युटर सेंटरमध्ये या अभ्यासक्रमाची स्वय शासनाच्या वतीने निश्चित करण्यात आलेली आहे एमकेसीएल या शासनाच्या अंगीकृत कार्यक्रमाचे हे अधिकृत प्रशिक्षण सेंटर आहे तुळजापूर तालुक्यातील अठरा वर्षाच्या वरील मराठा व कुणबी मराठा तरुणांनी तातडीने प्रवेश घ्यावा असे आवाहन संचालकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

हजारो रुपये शुल्क असणारे हे महत्वाचे आणि तरुणांना उपयुक्त कोर्सेस छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीस सन 2023-24 या वर्षांमध्ये मराठा, कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेल्या असून गरजू विद्यार्थ्यांनी तातडीने संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *