बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचे संपुर्ण मंत्रीमंडळ आईच्या चरणी आणण्याचे दिलेला शब्द मुख्यमंत्री शिंदे पुर्ण करणार अक्षय महाराज भोसले
तुळजापूर दिनांक २७ डॉ. सतीश महामुनी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेच्या मंदिराचा विकास आराखडा,
देविभक्तांसाठी होणारा दर्शन मंडप, प्रवेशव्दार,
पुजा-यांच्या व देविभक्तांच्या समस्या जाणून घेण्याकरीता शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले हे श्री तुळजा भवानी मातेची यथासाग पुजाअर्चा करून शुभार्शिवाद घेतला.त्याचे पौरोहित्य भोपे पुजारी विनोद सोंजी कदम यांनी केले.
संपुर्ण महाराष्ट्रातील मंदिरे,मठे,ऐतिहासिक स्थळांना भेट देवून तेथील पुजारी,सेवेदारी,महंत,मठाधिपती यांच्याशी चर्चा विनिमय करून समस्या जाणून त्यावर योग्य ती कार्यवाही करत त्यांचे समाधान केलं पाहिजे. ही भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे . साधू संतांच्या आशीर्वादाने निश्चित महाराष्ट्राचे सुराज्य होईल. शिंदे सरकारने हाती घेतलेल्या विहित कार्याला संतांच्या कृपेनेच अधिक बळ मिळेल ही आमची श्रद्धा आहे असे मत प्रदेशाध्यक्ष अक्षयजी महाराज यांनी या भक्तीशक्ती संवाद यात्रेत व्यक्त केले.
धर्मवीर आध्यात्मिक सेनेद्वारा तुळजापूर येथे आज दि.२७ डिसेबर रोजी सकाळी ११ वाजता श्री तुळजा भवानी मंदिर प्रशासकीय कार्यालयात घेतलेल्या बैठकीच्या माध्यमातून पुजा-यांनी अनेक समस्या समोर मांडल्या. त्या तात्काळ मार्गी लावू असे अभिवचन उपस्थितांना मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने अक्षय महाराजांनी दिले.
भक्ती शक्ती यात्रा हा केवळ दौरा नसून संवाद यात्रा आहे. व यातून समाजाच्या हिताचे निर्णय तात्काळ व्हावेत हा याचा मुख्य हेतू आहे. यावेळी मंदिरचे व्यवस्थापक प्रशासन तथा तहसिलदार सोमनाथ माळी,
शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम,
जिल्हाप्रमुख सुरज साळुंके,मोहन पनुरे,
उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके,तालुकाप्रमुख संभाजी पलंगे,शहराध्यक्ष बापू भोसले,युवासेना उपजिल्हाप्रमुख सुरज कोठावळे,उपतालुकाप्रमुख खंडू कुंभार,मोहन भोसले,अभिजीत अमृतराव,
भक्ती शक्ती संवाद यात्रा जनसंपर्क अधिकारी श्री.भोसले उपस्थित होते.
अक्षयमहाराज भोसले
प्रदेशाध्यक्ष, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना