माईंड अँड बॉडी योगा इन्स्टिट्यूट आणि स्वांतत्र्यवीर सावरकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “जागतिक योग दिवस” साजरा 

पुणे दिनांक २३ प्रतिनिधी

माईंड अँड बॉडी योगा इन्स्टिट्यूट, पुणे आणि स्वांतत्र्यवीर सावरकर फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिवस रविवारी  पु.ल. देशपांडे उद्यान मधील (मुघल उद्यान) सिंहगड रोड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

यावेळी मनाली देव (संस्थापक अध्यक्ष माईंड अँड बॉडी योगा इन्स्टिट्यूट पुणे ), अमोल देव ( हरितस चॅरिटेबल ट्रस्ट), स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनचे अध्यक्ष  प्रीतम थोरवे, सचिव मेघश्याम देशपांडे, विश्वस्त प्राची देशपांडे, वृषाली देशपांडे, क्रीडा भारती मंत्री-विजय राजपूत  आदी मान्यवर उपस्थित होते. 

या प्रसंगी नॅशनल गोल्ड  मेडलिस्ट आनिका पेठे, आर्या इनमादार, रिया यादव, निहारिका गद्रे,सानिका केळकर, शरण्या देवकर,चिन्मयी केळकर, प्रिती अभ्यंकर ,रुचा कानिटकर, निकिता वाघमारे, आयुष देव यांनी योगाची प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

या उपक्रमा विषयी बोलताना मनाली देव म्हणाल्या, मागील दहा वर्षांपासून हा उपक्रम आम्ही राबवत आहोत, योगासनाच्या 50 मिनिटांच्या पारंपारिक सदरीकरणा नंतर आमच्या  विद्यार्थ्यांनी आर्टिस्टिक योगाचे विविध प्रात्यक्षिके सादर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *