तुळजापूर दि 17 पुढारी वृत्त सेवा
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम ताई गोरे यांनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरास भेट दिली आणि देवीचे दर्शन घेतले दर्शनानंतर तेथील परिस्थितीचे अवलोकन केल्यानंतर त्यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे व्यवस्थापनाच्या मुद्द्यावर त्यांनी आपली नाराजी व्यक्त करताना सक्षम अधिकारी मंदिराच्या व्यवस्थापनासाठी नेमण्यात यावा अशी महत्त्वाची सूचना त्यांनी पत्रकाराची बोलताना केली.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे ह्या आज 17 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता त्यांनी तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त श्री. तुळजाभवानी मंदिराला भेट देऊन श्री.तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका प्रांजल शिंदे,उपविभागीय अधिकारी,योगेश खरमाटे,श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसिलदार सोमनाथ माळी प्रामुख्याने उपस्थित होते. उपसभापती नीलम ताई गोरे यांना तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये तेल विक्री होत असताना चे चित्र दिसून आले नवरात्राच्या गर्दीच्या काळात एखादा अनुचित प्रकार घडल्यानंतर त्याची गंभीर परिणाम प्रशासनाला आणि सरकारला भोगावे लागतात याची जाणीव त्यांनी करून दिली आणि शारदीय नवरात्र महोत्सवासारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या यात्रेचे नियोजन करण्यासाठी मंदिर संस्थान आणि चेअरमन यांनी सक्षम अधिकारी ची नियुक्ती करावी त्याशिवाय मंदिराची व्यवस्थापन अचूक होणार नाही. आपण या संदर्भात योग्य तो पाठपुरावा करू असे देखील त्यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले आहे.