शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यूजीसी प्रमाणे वेतन देण्यासाठी संघटना प्रयत्नशील – राष्ट्रीय अध्यक्ष आर.बी. सिंग, अमरावतीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षाचा शानदार सत्कार समारंभ

तुळजापूर दिनांक 13 डाॅ.सतीश महामुनी

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संघटना मागच्या 50 वर्षापासून काम करते आहे या कर्मचाऱ्यांना युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन प्रमाणे वेतन मिळाले पाहिजे ही मागणी मान्य होण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे आश्वासित प्रगती योजनेचे सर्व लाभ लवकरात लवकर मिळावे यासाठी संघटना प्रयत्नशील आहे असे उद्गार शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आर. बी. सिंग यांनी अमरावती येथे काढले. 12 – 24 या प्रश्नाची सोडवणूक झाल्याबद्दल कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचा शानदार सत्कार समारंभ अमरावती येथे संपन्न झाला.

सं.गा.बा.अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटना अमरावती चे वतीने महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १२/२४ वर्षाची आश्वासीत प्रगती योजना पुर्ववत लागु करुन दिल्याबद्दल कृतज्ञता सोहळा रविवार दि.१६ ऑगस्ट २०२३ ला देशमुख मंगलम कारंजा लाड येथे संपन्न झाला.

कृतज्ञता सोहळ्याचे अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष तथा सं.गा.बा.अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटना अमरावती चे अध्यक्ष मा.श्री रा.जा.बढे हे होते.कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऑल इंडिया काॅलेज अँण्ड युनिव्हर्सिटी फेडरेशन कोलकता चे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ कल्याण चे सरचिटणीस महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांचे आधार स्तंभ , प्रेरणा स्थान डॉ आर.बी.सिंह हे होतें. कार्यक्रमांचे उदघाटक शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय कारंजा लाड चे प्राचार्य डॉ सुभाष गवई सर होतें.प्रमुख अतिथी या.श्री माधव राऊळ महासंघ चिटणीस तथा मुंबई विभागाचे सरचिटणीस उपस्थित होते,श्री दिलीप पवार महासंघाचे सहचिटणीस , मुंबई विभागाचे चिटणीस हजर होते आणि श्री चंदर पांडे महासंघाचे सचिव उपस्थित होते.

मंचावर महासंघाचे उपाध्यक्ष तथा अमरावती विभागीय संघटनेचे सरचिटणीस, आयोजन समितीचे अध्यक्ष श्री सुदाम मुगल उपस्थित होते आणि आयोजक समितीचे स्वागताध्यक्ष तथा वाशिम जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री उमेश देशमुख हे उपस्थित होते.सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन आणि स्वरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यानंतर आयोजक समितीचे स्वागताध्यक्ष तथा वाशिम जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री उमेश देशमुख यांनी स्वागतपर भाषण करुन कारंजा लाड या नगरीत सर्व मान्यवर पाहुणेअसंख्य शिक्षकेतर कर्मचारी हजर झाल्याबद्दल सर्वांचे स्वागत केले आणि धन्यवाद देऊन आणि व्यवस्थे मध्ये काही ऊणीव राहिल्यास दिलगिरी व्यक्त केली .

यानंतर डॉ आर.बि.सिंह यांनी अयोध्या येथुन आणलेल्या दुप्पटा , प्रसाद आणि कर्मयोगी डॉ आर.बी.सिंह हे पुस्तक देऊन विभागीय संघटनेचे पदाधिकारी, सर्व जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते यांचा सत्कार केला.यानंतर आयोजक समितीचे वतीने सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ आणि गुरु माऊलींची मुर्ती देऊन सत्कार करण्यात आला.यानंतर आयोजक समितीचे अध्यक्ष श्री सुदाम मुगल यांनी प्रास्ताविक करुन पाहुण्यांचा परिचय करून दिला.

आपल्या प्रास्ताविक मध्यें महासंघाचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आत्मसन्मान आणी आर्थीक स्थैर्य मिळवून दिले.अमरावती विभागीय संघटनेने केलेल्या कार्याचा आढावा घेतला.तसेच महासंघाचे माजी अध्यक्ष स्व.दाजी देशपांडे,स्व.विजय निकम यांनी शिक्षकेतर कर्मचारी करीता दिलेल्या भरीव योगदानची माहिती देऊन त्यांचे पुण्यस्मरण केले तसेच डॉ आर.बी.सिंह यांनी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी करीता मागील पन्नास वर्षापासून केलेल्या कार्याची माहिती देऊन आजही शिक्षकेतर कर्मचारी यांचे हिता करीता अहोरात्र मेहनत घेत आहेत असे सांगितले.यानंतर विशेष सत्कार श्री अनंत सोमवंशी अमरावती जिल्हा माजी अध्यक्ष यांची भारतीय विद्या मंदिर अमरावती या शिक्षण संस्थेच्या सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल,श्री सुनील तिप्पट यांची अमरावती विद्यापीठात सिनेट सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल,श्री रविंद्र धानोरकर यांची वसंत जिनींग ॶॅणड फॅक्टरी वणी येथे संचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल,श्री एकनाथ जुवार अमरावती जिल्हा माजी अध्यक्ष यांनी संघटनेकरीता केलेल्या भरीव योगदानाबद्दल श्री नितीन तसरे यांना संत.गा.बा.अमरावती विद्यापीठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मा. डॉ आर.बी.सिंह आणि श्री राजाभाऊ बढे,मा.प्राचार्य सुभाष गवई यांचे हस्ते करण्यात आला.तसेच आयोजन समितीचे सर्व सदस्यांचा सत्कार शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यानंतर डॉ सुभाष गवई यांनी उद्घाटनपर भाषण करुन मार्गदर्शन केले.यांनंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजाभाऊ बढे यांनी अध्यक्षीय भाषण करुन आश्वासीत प्रगती योजना पुर्ववत लागु करण्यासाठी मागील पाच वर्षांपासून आणि करोना काळात सुद्धा केलेल्या कार्याची माहिती दिली आणि वाशिम जिल्हा अध्यक्ष श्री उमेश देशमुख यांनी कृतज्ञता सोहळा करीता केलेल्या परिश्रम आणि देशमुख मंगलम उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद देऊन कौतुक केले.यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक दर्शक आणि महासंघाचे सरचिटणीस डॉ आर.बी.सिंह यांनी मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय अध्यक्ष आर.बी .सिंग आपले भाषणांत महासंघाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काय मिळवले यांची माहिती देऊन आश्वासीत योजना पुर्ववत लागु झाली म्हणून संपूर्ण प्रश्न मार्गी लागले असे नसुन शिक्षकेतर कर्मचारी करीता १०/२०/३० लागु करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे करीता सतत कार्य करुन मिळवून देणारच असे सांगितले तसेच युजीसी वेतन मध्ये महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागु करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील असे सांगितले. सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संघटनेकरीता करीता प्रत्येकी रु १५००/- चे योगदान देण्यांत यावे असे आवाहन केले. यानंतर कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन आयोजक समितीचे सहसचिव तथा अमरावती जिल्हा संघटनेचे सचिव श्री प्रफुल्ल घवळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ जाधव सर यांनी केले.कार्यकमाला विभागातील बहुसंख्येने कर्मचारी उपस्थित होते.कृतज्ञता सोहळ्याचे संपूर्ण तयारी आयोजन समितीचे कार्याध्यक्ष श्री ज्ञानेश्वर बारस्कर, सचिव श्री प्रशांत देशमुख, स्वागताध्यक्ष श्री उमेश देशमुख यांनी केली कार्यक्रमाकरीता श्री उमेश देशमुख यांनी विनामूल्य देशमुख मंगलम कार्यालय उपलब्ध करून दिले . कार्यक्रम यशस्वी करीता आयोजक समितीचे अध्यक्ष श्री सुदाम मुगल, कार्याध्यक्ष श्री ज्ञानेश्वर बारस्कर, सचिव श्री प्रशांत देशमुख, उपाध्यक्ष श्री गुड्डू शेखावत, उपाध्यक्ष श्री राजाभाऊ देशमुख, सहसचिव श्री प्रफुल्ल घवळे, कोषाध्यक्ष श्री प्रभाकर भोयर, प्रसिद्धी प्रमुख श्री चंद्रकांत इंगळे, सल्लागार श्री जयंत निखारे आणी सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले तसेच शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *