चित्रकला स्पर्धेतील स्पर्धकांना पारितोषिक वितरण ,शिक्षकांचा सत्कार व वृक्षारोपण संपन्न
तुळजापूर-( दि.५) शिक्षक हा राष्ट्राचा काणा तर विद्यार्थी हे राष्ट्राचे भविष्य असून शिक्षकांच्या हातून भारतातील सक्षम युवा पिढी निर्माण होते.
देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये शिक्षकाचे अनमोल योगदान आहे. तसेच अमोल कुतवळ यांचे कार्य तरुणांसाठी आदर्श व मार्गदर्शक आहे असे गौरव उद्गगार माजी पालकमंत्री मधुकर चव्हाण यांनी नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन तुळजापूर येथे संपन्न झालेल्या मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्षानिमित्त व जनसेवक अमोल भैय्या कुतवळ यांच्या वाढदिवसानिमित्त भोला दयावान ओडिया राज मित्र मंडळ व मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्ष संयोजन समिती तुळजापूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी, व शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक समारंभ प्रसंगी व वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी गौरव उद्गगार काढले.
यावेळी प्रमुख अतिथी शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक मगर,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष कुलदीप (धीरज)कदम पाटील,व नगरसेवक सुनील रोचकरी, युवा नेते रणजित इंगळे,आनंद जगताप,प्रवीण कदम,सुदर्शन वाघमारे,मुख्याध्यापक गणेश रोचकरी उपस्थित होते.
यावेळी तुळजापूर शहरातील सेवानिवृत्ती शिक्षकासह विविध शाळेतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ७५ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षक प्रतिनिधी महेंद्र पाटील, सुवर्ण सुवर्णा धर्माधिकारी दीक्षित, सुरजमल शेटे, विद्यार्थी प्रतिनिधी कु. आरुषी सोमनाथ केवटे यांनी मनोगत व्यक्त केले.
चित्रकला स्पर्धेमध्ये गट क्र १ (इ३ री ते ४थी )गटात प्रथम क्रमांक कु. आरुषी सोमनाथ केवटे (नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ तुळजापूर खुर्द) द्वितीय कु.शर्वरी नितीन जगदाळे (तुळजामाता इंग्लिश मीडियम स्कूल) तृतीय माऊली सतीश हाजगुडे (नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ तुळजापूर खुर्द) चतुर्थ मल्हार वाघ (तुळजामाता इंग्लिश मीडियम स्कूल) पाचवा वेदांत सचिन जमदाडे (तुळजामाता इंग्लिश मीडियम स्कूल) व कु. धनश्री धीरज नरसुडे (नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक २) यासह एकूण २० जणांना उत्तेजनार्थ पारितोषिके गट क्रमांक २ (इ.५ वी ते इ.७ वी) मध्ये प्रथम क्रमांक कु. सृष्टी ओमकार दुरुगकर (लिटर फ्लॉवर मराठी प्रशाला) द्वितीय कु.अक्षरा रमेश भोजने (जिजामाता कन्या माध्यमिक शाळा) तृतीय सुशांत जनक महार (तुळजामाता इंग्लिश मीडियम स्कूल) चौथा कु. श्रेया अमोल रेणके (लिटल फ्लॉवर मराठी प्रशाला) पाचवा अलमीरा रहीम शेख (तुळजामाता इंग्लिश मीडियम स्कूल) कु. सृष्टी रविकिरण साळुंखे (नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक २) यासह वीस उत्तेजनार्थ गट क्रमांक ३ (इ८वी ते इ.१० वी) प्रथम वैभव सुनील कांबळे (तुळजाभवानी सैनिक विद्यालय) द्वितीय कु. भाग्यशाली ज्योतिबा पवार (तुळजाभवानी माध्यमिक विद्यालय) तृतीय स्वराज्य विजय जळके (म.वि.रा.शिंदे प्रशाला) चतुर्थ कु.प्राची राजकुमार रुईकर (तुळजाभवानी माध्यमिक विद्यालय) पाचवा दीक्षायणी बाळासाहेब पाटील म.वि.रा.शिंदे प्रशाला) यासह २० उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त एकूण ७५ विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात, प्रमाणपत्र व चित्रकलेचे साहित्य देऊन गौरविण्यात आले.
तुळजापूर शहरातील सर्व शाळेतील चित्रकलेतील आवड असणाऱ्या २५७५ विद्यार्थ्यांना मोफत चित्रकला वह्याचे वाटप करण्यात आले.
याच कार्यक्रमात नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ येथे विविध जातींच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल भैय्या कुतवळ यांनी केले सूत्रसंचालन महेंद्र पाटिल सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रेयस कुतवळ यांनी केले कार्यक्रम यशस्वी साठी शिवा डाके सह छोटू पाटील,सुनील मामा शिंदे,युसुफ भाई शेख,संजय इंगळे, विकास बापू चव्हाण,संतोष पप्पू पवार,बिरु आप्पा माने,औदुंबर करंडे-पाटील,संकेत पाटील,अजय धनके,नितीन गुंजाळ,प्रफुल्ल कांबळे,आण्णा गोंडगिरे, कुणाल रोंगे,सलमान शेख,श्रीनाथ काशीद,रणजित पाटील,पवन राजे इंगळे,ओंकार हंगरगेकर,गणेश अमृतराव,अब्दुल शेख,ज्ञानेश्वर देवकर,युवराज पवार,संतोष पवार,सचिन जाधव,संजय सगट जफर शेख, शिवाजी इटकर,पपू चौगुले, इ जणांची उपस्थिती होती..