स्वामी रामानंद तीर्थ यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा – संस्कार भारतीची मागणी, समितीचे समन्वयक मुरलीधर होनाळकर यांनी मांडला ठराव

धाराशिव दि. १७ प्रतिनिधी

मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये महत्त्वाचे योगदान देणारे स्वामी रामानंद तीर्थ भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख सेनानी आहेत, त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा येथील कार्यक्रमात करण्यात आली.

लोहारा तालुक्यातील हिप्परगा ( रवा ) येथील मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृतीस्तंभ येथे आयोजित केलेल्या संस्कार भारती जिल्हा धाराशिव यांच्या कार्यक्रमात स्वामी रामानंद तीर्थ यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी येथील जिल्हा मराठवाडा मुक्ती संग्राम समिती समन्वयक मुरलीधर होनाळकर यांनी केली. या कार्यक्रमासाठी हुतात्मा पत्नी रुक्मिणीबाई पंढरी मुळे, प्रांत लोककला प्रमुख डॉ. सतीश महामुनी, स्वामी रामानंद तीर्थ शिक्षण संस्थेचे संचालक संजय जाधव, प्रांत चित्रकला विधाप्रमुख कलाध्यापक शेषनाथ वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल ढगे, सरपंच अभिमान कांबळे, ग्राम पंचायत सदस्य सुनील जाधव, गुलचंद मुळे, लोहाराध्यक्ष बालाजी मक्तेदार, तुळजापूर अध्यक्ष प्रफुल्लकुमार शेटे, दयानंद पोतदार, सुरेश वाघमारे, सुधीर महामुनी, लक्ष्मीकांत सुलाखे, यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृतिस्तंभ पूजन करण्यात आले त्यानंतर हुतात्मा पत्नी रुक्मिणीबाई पंढरी मुळे यांचा संस्कार भारतीच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायत सरपंच अभिमान कांबळे यांचा सर्व ग्रामस्थांचे प्रतिनिधी म्हणून शाल पुष्पगुच्छ देऊन संस्कार भारतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोहराध्यक्ष बालाजी मक्तेदार यांनी केले या स्वातंत्र्यसंग्रामातील प्रमुख कार्यक्षेत्र असणारे हे शक्ती स्थळ आहे स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांनी येथे प्रदीर्घकाळ वास्तव्य करून स्वातंत्र्य लढ्याला निर्णय यश मिळेपर्यंत लढा दिला असे सांगितले. प्रांत लोककला विभाग प्रमुख डॉ. सतीश महामुनी यांनी स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याला देशपातळीवर गौरवण्यात येईल असे सांगितले.
स्मृति स्तंभाच्या सभोवताली संस्कार भारतीच्या वतीने दीपोत्सव करण्यात आला या निमित्ताने आकर्षक रांगोळ्याचे रेखाटन संस्कार भारतीच्या कलाकारांनी येथे केले. संजय जाधव , सुधीर महामुनी यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी. गावातील सरपंच अभिमान कांबळे सुनील जाधव संजय जाधव , धर्मवीर जाधव, प्रमोद जाधव, बालाजी काटे, ज्ञानेश्वर जाधव, विजय पवार, अनिकेत जाधव, सारंग गाटे, दिनेश गिराम अंबाजी जाधव अप्पासाहेब जाधव तुकाराम जाधव सागर होनाळकर अमित पाटील यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *