आई राजा उदो उदो…….तुळजाभवानी देवीजींची रथअलंकाराने महापूजा

तुळजापुर ,दि.१८ डॉ. सतीश महामुनी

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या चौथ्या दिवशी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये देवीला रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली होती. शेकडो भाविक भक्तांनी या निमित्ताने तुळजाभवानी देवीचे धर्मदर्शन आणि मुखदर्शन घेतले, आई राजा उदो उदो जय जय घोषामध्ये भाविकांनी मनोभावे देवीचे गुणगान केले आणि देवीचे आशीर्वाद घेतले.

तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या पूजा केल्या जातात, चतुर्थीच्या निमित्ताने बुधवारी रथालंकार महापूजा करण्यात आली होती. तुळजाभवानी देवी रथामध्ये बसून सार्थक करीत आहे देवीच्या रथाला रथाला सात घोडे बांधलेले असून देवीच्या हातामध्ये सार्थक करणारी दोरी आहे दुसऱ्या हातामध्ये चाबूक असून देवी रथ चालवीत असल्याचे हे दृश्य भाविकांना पहावयास मिळाले. चतुर्थीच्या निमित्ताने सकाळपासून धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल मंदिरामध्ये दिसून आली. मध्य रात्री १ वाजता तुळजाभवानी देवीची चरण तीर्थ पूजा संपन्न झाली त्यानंतर देवीचे धर्मदर्शन सुरू झाली, ही पूजा आरती पूर्ण झाल्यानंतर सकाळी ७ वाजेपर्यंत दर्शन सुरु होतें.
सकाळी ७ वाजता नवरात्र काळात अभिषेक पूजा करण्यासाठी आलेल्या भाविकांचे अभिषेक देवीला करण्यात आले. मंगळवारी रात्री दहा वाजता तुळजाभवानी देवीचा छबिना निघाला आणि छबिनामध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग नोंदवला.

चतुर्थीच्या दिवशी भाविकांची संख्या मर्यादित होती, अभिषेक पूजा संपन्न झाल्यानंतर देवीच्या नवरात्र काळात बांधण्यात येणाऱ्या रथ अलंकार महापुजेसाठी देवीची पुजारी बांधव यांनी देवीला हातामध्ये बसून सारथ्य करीत असल्याचा देखावा पूर्ण केला. देवीचे पूजारी सचिन परमेश्वर, बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, काँग्रेस जिल्हा अध्याक्ष धीरज पाटील, अतुल मलबा, गब्बर सोंजी, प्रशांत साँजी, समाधान परमेश्वर, धीरज भय्ये, यांनी सुमारे दीड तास देखावा मांडण्यासाठी काम केले. परंपरागत पद्धतीने नवरात्र काळात ही पूजा मांडण्याची ही परंपरा आहे. याप्रसंगी तहसीलदार सोमनाथ माळी, प्रशासनातील अधिकारी सिद्धेश्वर इंतुळे, यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *