आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, पुतळा जाळून निषेध, पुन्हा टीका केली तर रस्त्यावर फिरू देणार नाही – महेंद्र धुरगुडे

तुळजापूर दिनांक 20 डॉ. सतीश महामुनी

आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने पवार कुटुंबीय आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करतात आणि प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात परंतु धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना आज इशारा देण्यात येतो आहे की त्यांनी आपली बेताल वक्तव्य थांबवावी अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी धाराशिव येथे केलेल्या आंदोलनात दिला आहे

आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्य अत्यंत निषेधार्य आहे आणि अत्यंत कठोर शब्दांमध्ये त्याचा निषेध करीत आहोत धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार पडळकर यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करून त्यांचा पुतळा जाळण्यात आलेला आहे ही कृती लोकशाहीच्या मार्गाने असून त्यांनी आपले बेताल वक्तव्य नाही थांबवले तर आणि भविष्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बेताल वक्तव्य केल्यास आमदार पडळकर यांना रस्त्यावर देखील फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या कामाने मोठे झालेले आहेत पहाटे उठून जनतेच्या कामासाठी ते वेळ देतात जनतेचे काम करून राज्य सरकारला भक्कम करण्याचे काम ते करीत आहेत 16 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राज्य सरकारने मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत या निर्णयामुळे सरकारचे प्रतिमा मराठवाड्यात चांगली झालेली आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासारखी बेताल वक्तव्य करणारी माणसं राज्य सरकारच्या चांगल्या कामाला डाग आणण्याचे काम करीत आहेत त्यांना आमदार करणाऱ्या नेत्यांनी देखील त्यांना थांबवले पाहिजे त्यांच्या कृतीमुळे सरकार बदनाम होते आहे याच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र दुर्गुडे

धूरगुडे यांनी लक्ष वेधलेअजित दादा यांच्या कामामुळे आणि महाराष्ट्रात असलेले त्यांचे वर्चस्व लक्षात घेऊन त्यांना सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनवलेले आहे याची माहिती संबंध महाराष्ट्राला आहे तळमळीने लोकांसाठी झटणारा नेता म्हणून अजित पवार यांची सर्वत्र प्रतिष्ठा आहे अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींना वेळीच फायबंध घाला अन्यथा धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही जशास तसे उत्तर दिले जाईल असा कठोर इशारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या आंदोलनात देण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडी आणि इतर जिल्हास्तरीय नेत्यांनी याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आपल्या भाषणामधून आमदार गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेतला त्यांचा पुतळ्यास जाळण्यात आला आणि प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *