आर्ट ऑफ लिविंगची सुदर्शन क्रिया , निरोगी जीवनासाठी मोलाची – प्राचार्य प्रशांत चौधरी

धाराशिव येथे महाजन महाविद्यालयात आर्ट ऑफ लिविंग चे शिबिर संपन्न

तुळजापूर दि 24 न्युजमराठवाडा प्रतिनिधी

धाराशिव येथे व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयामध्ये आर्ट ऑफ लिविंग धाराशिव संस्थेच्या वतीने सहा दिवसांचे आनंद अनुभूती शिबिर संपन्न झाले. आर्ट ऑफ लिविंग च्या प्रशिक्षिका कु. संस्कृती शाहूराज घोडके यांनी सहा दिवस दररोज तीन तास नियमित प्रशिक्षण घेतले.

व्यंकटेश महाजन महाविद्यालयामध्ये सायंकाळी 4 पासून 7 वाजेपर्यंत सहा दिवस चाललेल्या या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालय प्राचार्य डॉ प्रशांत चौधरी व प्रोफेसर अर्चना झाडे, प्रशिक्षिका कु संस्कृती घोडके याप्रसंगी आर्ट ऑफ लिविंग चे राहुल गिरवलकर आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.

आर्ट ऑफ लिविंग कडून शिकवण्यात येणारी सुदर्शन क्रिया या सहा दिवसाच्या शिबिरामध्ये शिबिरार्थींना शिकवण्यात आली याशिवाय योगा आणि प्राणायाम याचे धडे प्रशिक्षिका घोडके यांच्याकडून देण्यात आले. निरोगी आरोग्यासाठी सुदर्शन क्रिया आणि प्राणायाम याचे खूप महत्त्वाचे योगदान राहिलेले आहे हे लक्षात घेऊन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत चौधरी यांनी या शिबिरामध्ये स्वतः सहभागी होऊन अशा प्रकारचे शिबिर आणि सुदर्शन क्रिया करण्यासाठी प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने आपला सहभाग नोंदवला पाहिजे असे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले. शेवटच्या दिवशी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करून या सहा दिवसांच्या आर्ट ऑफ लिविंग च्या शिबिराचा समारोप करण्यात आला महाविद्यालयाच्या वतीने डॉ. चौधरी यांनी प्रशिक्षिका घोडके यांचा सत्कार केला आणि आर्ट ऑफ लिविंग च्या कार्यपद्धतीचे अनुकरण सर्वांनी करावे असे आवाहन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *