कराओके ट्रॅक आणि सुरेल गायक – ओठावरची गाजलेली गाणी हे आहे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य
तुळजापूर दि 28 डाॅ.सतीश महामुनी
जगभरात आपल्या मुलायम आवाजाने रसिक मनावर अधिराज्य गाजवणारे गायक महंम्मद रफी यांची 29 जुलै रोजी पुण्यतिथी साजरी होत आहे या निमित्ताने तुळजापूर येथील स्थानिक कलाकार संस्था “स्वरयात्री कला मंच” यांच्या वतीने “सुरेल गाण्याची मैफिल” सायंकाळी पाच वाजता नगरपरिषद तुळजापूरच्या बाजूस जाधव कॉम्प्लेक्स दुसऱ्या मजल्यावर आयोजित केले आहे. हिंदी चित्रपट गाण्यांची आवड असणाऱ्या सर्व रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. हा कार्यक्रम निशुल्क आहे. उत्तम तयारी सुरेल आवाज आणि कराओके अत्याधुनिक ट्रॅक अशा गुणवैशिष्ट्यांनी हा कार्यक्रम बहरला जाणार आहे, आवर्जून उपस्थित राहावे असा हा श्रवणीय कार्यक्रम असल्यामुळे मिळालेला प्रतिसाद मोठा आहे.
1960 पासून 1980 पर्यंतच्या हिंदी चित्रपटातील विविध गाण्यांचा समावेश या कार्यक्रमांमध्ये करण्यात येत आहे सुमारे एक महिना स्वर यात्री कला मंच च्या कलाकारांनी रियाज करून हा कार्यक्रम तयार केला आहे यामध्ये गाण्यात येणारी गीते अत्यंत लोकप्रिय असल्यामुळे प्रेक्षकांना खूप चांगली गाण्याची मेजवानी मिळणार आहे. महंम्मद रफी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम होत आहे.
हिंदी चित्रपट सृष्टीला सुवर्णकाळ मिळवून देणारे दिग्गज प्रतिभासंपन्न कलावंंत दिलीप कुमार ,अमिताभ बच्चन, राजेश खन्ना , शशि कपूर धर्मेंद्र जितेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, ऋषी कपूर यांच्यासारख्या प्रतिमा संपन्न अनेक कलावंतांना “पद्मश्री मोहम्मद रफी” यांनी आपला आवाज दिला आणि त्यांची गाणी लोकप्रिय ठरली. हीच लोकप्रिय गाणी कराओके ट्रॅकवर “स्वरयाञी” कलामंचचे कलाकार आपली गाणी सादर करीत आहेत.
तुळजापूर नगर परिषदेच्या बाजूला असणाऱ्या जाधव कॉम्प्लेक्स मध्ये दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या कोचिंग क्लासेस हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आहे सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम सुरू होत आहे. रविवार 29 जुलै 2023 रोजी सायंकाळी 5.00 वा. हा कार्यक्रम होत आहे.