तुळजापूर दिनांक 26 न्यूज मराठवाडा प्रतिनिधी
कार्य स्तुत्य आहे,असेच सुरु ठेवा,आम्ही सोबत आहोत-आ. सचिन अहिर
गेल्या वर्षभरापासून उमरगा लोहारा मतदारसंघात जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी आपुलकीने आणि आत्मीयतेणे पुढाकार घेणारे माजी मंत्री बच्चू कडू यांचे स्वीयसहाय्यक सातलिंग स्वामींनी दि 26 ऑगस्ट रोजी विधानपरिषद आमदार तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना नेते आ. सचिन अहिर यांची सदिच्छा भेट घेतली दरम्यान उमरगा लोहारा मतदार संघातून ठाकरे गट सेनेतर्फे विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली.
यावेळी आ. सचिन अहिर यांनी सातलिंग स्वामींच्या या मतदार संघातील सुरु असलेल्या कार्याचे कौतुक केले आणि असेच कार्य सुरु ठेवा आम्ही तुमच्या सोबत आहोत. लवकरच पक्ष प्रमुख उद्धव साहेबांशी भेट घेऊ आणि तुमच्या उमेदवारिबाबत सकारात्मक बोलू अशी हमी दिली.
यावेळी श्री राहुल नावंदे आणि श्री सचिन वाले आदी मान्यवर उपस्थित होते.
गेल्या काही महिन्यापासून श्री सातलिंग यांच्या कार्याचा दबदबा तालुक्यातच न्हवे तर जिल्हाभरात गाजत आहे. दिव्यांग, अनाथ, विधवा, मजूर, कामगार, शेतकरी, पिडीत शोषित व्यक्ती केवळ एक फोन द्वारे आपल्या अडचणी कळविल्या तरी त्याबाबत पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेताना श्री स्वामी दिसून येत आहेत.
तालुका व परिसरातील सुशिक्षित तरुण युवक युवतीना त्यांच्या शैक्षणिक दर्जेनुसार हक्काचा रोजगार प्राप्त व्हावा यासाठी उमरगा औद्योगिक वसाहतीत नामवंत कंपनीचे आगमन होणे अत्यावश्य आहे.पेरणी झाल्यापासून पावसाने दांडी मारल्याने पिके जळून खाक झाली आता बँकेचे कर्ज शेतकऱ्यांने फेडायचे कसे.? त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना विनाअट पिक कर्ज देण्यात यावा आणि या भागातील शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करण्यात यावे.
भूकंपग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने ठोस पाऊल उचलणे आदी विषयावर यावेळी सविस्तर चर्चा झाली असे श्री सातलिंग स्वामींनी माहिती दिली.
लोकांचे प्रस्थापित अपेक्षा सामान्य उमेदवाराला पसंती उमरग्याचे समीकरण यावेळेस बदलणार
उमरगा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणारे सातलिंग स्वामी हे धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणाशी निकटवर्ती आहेत अनेक वर्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राजकारणामध्ये त्यांनी जवळून काम केलेले आहे जनतेच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे कार्यकर्त्याचा चांगला संच त्यांच्याकडे आहे समाजकारण आणि राजकारण अशा दोन्ही पातळीवर त्यांनी काम केलेले असल्यामुळे ग्राउंड लेव्हलवर जनसंपर्क चांगला ठेवण्यामध्ये त्यांना चांगले यश प्राप्त झालेले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासाठी या जिल्ह्यामध्ये चांगले वातावरण आहे जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बद्दल जिल्ह्यातील लोकांमध्ये खूप चांगली लोकप्रियता आहे आमदार कैलास पाटील आणि धाराशिव चे नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांच्याशी सातलिंग स्वामी यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत या सर्व परिस्थितीचा विचार करता सातलिंग स्वामी हे उमरगा तालुक्याच्या राजकारणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी समर्थ असल्याचे दिसून येत आहे. उमरगा तालुका हा यापूर्वीचे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांचा तालुका आहे. राज्य सरकारच्या सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सामील झाल्यानंतर या सरकार बद्दल आणि एकूणच महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दल जनमानसामध्ये नाराजीचे वातावरण आहे या वातावरणाचा फायदा घेण्याच्या उद्देशाने सातलिंग स्वामी यांनी या मतदारसंघांमध्ये आपली जोरदार तयारी ठेवली आहे मोठा जनसंपर्क अनेक महिन्यापासून त्यांनी ठेवल्यामुळे त्यांची उमेदवारी प्रभावी ठरणार असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.