तुळजापूर दिनांक 12 प्रतिनिधी
श्री समर्थ कॉम्प्युटर आणि जे बी कॉम्प्युटर यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजन
महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत कार्यक्रमासणारा लाखो संगणक साक्षर आणि संगणक तज्ञ विद्यार्थी घडवणारे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित एम. के. सी. एल. यांच्यामार्फत 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रश्नमंजुषा घेण्यात आली. तुळजापूर तालुक्यातील 8 हजार 500 विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवला.
तुळजापूर तालुक्यात एमकेसीएलच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला . एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक धनंजय जवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न झाल्या.
शालेय विद्यार्थ्यांसाठी इतिहासावर आणि महाविद्यालय स्तरासाठी साठी न्यू एज टेक्नॉलॉजी वर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली. यामध्ये तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ मसला माळुंब्रा काक्रंबा बारुळ जवळगा मेसाई आरळी मंगरूळ नांदुरी सह तुळजापूर शहरातील सर्व शाळांचा उत्स्फूर्त सहभाग होता याचबरोबर तुळजाभवानी महाविद्यालय यशवंतराव चव्हाण महाविद्यालय कुलस्वामिनी विद्यालय तुळजाभवानी अध्यापक विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. जवळपास 8500 विद्यार्थ्यांचा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग होता सर्व शाळा व कॉलेजमधील प्राचार्य आणि शिक्षकांनी यामध्ये सहकार्य केले. तुळजापूर तालुक्यामध्ये या प्रश्नमंजुषाचे आयोजन श्री समर्थ कॉम्प्युटर्सच्या संचालिका अनुराधा नाईक तसेच जे बी कॉम्प्युटर्सचे संचालक संजय जाधव सर यांनी केले. यासाठी एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक धनंजय जेवळीकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.