तुळजापूर दि २१ न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची गद्दारी करणाऱ्या गद्दार राक्षसांचा बिमोड करून पुन्हा एकदा महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडीचे सरकार येऊ द्या असे साकडे महाराष्ट्रात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी तुळजाभवानी देवीला घातले. तत्पूर्वी मंदिर संस्थांच्या वतीने उपजिल्हाधिकारी योगेश खरमाटे व तहसीलदार सोमनाथ माळी यांच्या हस्ते त्यांचा संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच सर्व महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे नवीन गद्दारांना निश्चित जनता घरी पाठवेल असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री पदावर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना विराजमान कर त्यासाठी आम्हाला शक्ती दे असेही या निमित्ताने विरोधी पक्षनेते दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तुळजापूर तालुका शिवसेना तुळजापूर शहर शिवसेना आणि मंदिर संस्थांच्या वतीने याप्रसंगी तुळजाभवानीची प्रतिमा देऊन प्रतिमा देऊन विरोधी पक्ष नेत्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळेस शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शामलताई वडणे, सोलापूर महिला जिल्हाप्रमुख अस्मिताताई गायकवाड, पंढरपूर महिला जिल्हाप्रमुख पूनमताई अभगराव, लातूर जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, धाराशिव जिल्हाप्रमुख रणजित पाटील ,युवासेना सचिव अक्षय ढोबळे, माजी उपजिल्हाप्रमुख शाम पवार, युवासेना तालुका प्रमुख प्रतीक रोचकरी, सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, उपतालुकाप्रमुख सुनील जाधव , उपशहरप्रमुख बाळासाहेब शिंदे , युवा सेना शहरप्रमुख सागर इंगळे, विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख विकास भोसले ,आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. महिला गाडीच्या जिल्हाप्रमुख शामलताई पवार यांनी याप्रसंगी विरोधी पक्ष नेत्यांना कवड्याची माळ घातली.