भाजपच्या प्रदेश कार्यकारणीवर गुलचंद व्यवहारे यांची निवड
तुळजापूर दिनांक 25 वृत्तसेवा
भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून निष्ठावंत कार्यकर्ते गुलचंद दगडोबा व्यवहारी यांची निवड झाली आहे. आमदार सुजितसिह ठाकूर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.
विद्यार्थी दशेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या मशीन मध्ये तयार झालेले गुणचंद्र व्यवहारे यांच्या या निवड सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले आहे. २००१मध्ये त्यांनी आमदार ठाकूर यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला त्यानंतर 2003 पर्यंत तालुका उपाध्यक्ष 2006 पर्यंत युवा मोर्चा तालुकाध्यक्ष 2010 पर्यंत युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस 2015 पर्यंत भाजपा जिल्हा चिटणीस या पदावर दोन टर्म काम केले. 2023 पर्यंत जैन प्रकाश विभागीय अध्यक्ष म्हणून निवड झाली.
यापूर्वी भारतीय जनसंघटना, शिवछत्रपती सामाजिक संस्था, कला साधक अकादमी या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी भरीव सामाजिक काम केले आहे 2015 मध्ये तीव्र दुष्काळात जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी 67 दिवस चारा छावणी चालवून गुलचंद व्यवहारे यांनी पशुपालकांना आधार दिला तत्कालीन प्रदेश भाजपाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांनी या छावणीचे उद्घाटन केले होते. 2005 मध्ये नेहरू युवा केंद्राचा त्यांना पुरस्कार मिळाला उजेडाचे मानकरी हा मानाचा प्रतिष्ठेचा अहमदनगर येथील पुरस्कार सुजाताई कांकरिया यांच्या हस्ते मिळाला. भास्कर पेरे पाटील आणि बीज माता राहीबाई यांनी देखील व्यवहारी यांना सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे याशिवाय तुळजापूर सोलापूर रेल्वे मागणीच्या आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून रेल्वे संघर्ष समितीमध्ये ते सक्रिय आहेत. भारतीय जनता पार्टीने प्रदेश कार्यकारिणीवर त्यांना स्थान दिल्याबद्दल निष्ठावंत कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.