तुळजापूर दि 18 प्रतिनिधी
तुळजापूर येथील प्रसिद्ध चित्रकार नंदकुमार पोतदार यांचे अल्प आजाराने निधन झाले आहे त्यांच्यावर 19 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संस्कार भारती या कलाकाराच्या संघटनेचे ते पंधरा वर्षे चित्रकला विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत .तसेच कलाविष्कार या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत.
तुळजापूर येथील चित्रकार आणि व्यापारी नंदकुमार विठ्ठलराव पोतदार यांचे अल्प आजाराने सोलापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, एक मुलगी नातवंडे असा मोठा परिवार आहे. एन. पोतदार नावाने त्यांनी तुळजापूर येथे चित्रकला क्षेत्रात प्रदीर्घ काळ काम केले. तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या मार्गावर सोन्या मारुतीच्या समोर प्रदीर्घकाळ त्यांनी व्यापार केला. मूर्तिकार चित्रकार आणि रंगकाम अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नंदकुमार पोतदार यांनी काम केलेले आहे. त्यांच्यावर 19 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता अपसिंगा रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कला क्षेत्रामध्ये चित्रकार नंदकुमार पोतदार यांचे मोठे योगदान राहिलेले आहे 1998 पासून ते तुळजापूर संस्कार भारतीच्या चित्रकला विभागाचे प्रमुख म्हणून आजपर्यंत कार्यरत आहेत तसेच कलाविष्कार नृत्य संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहै. तुळजाभवानी देवस्थान समितीच्या वतीने त्यांना मागील चाळीस वर्षापासून मंदिर परिसर रंगवणे आणि छबिण्यासाठी वापरण्यात येणारे वाहन रंगविण्याचा मान दिलेला आहे. दरवर्षी नवरात्राच्या अगोदर नंदकुमार पोतदार यांच्याकडून मंदिर संस्थानची ही कलात्मक सेवा केली जाते. चित्रकला रांगोळी गायन या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांचा वावर कायम राहिला आहे त्यांच्या जाण्यामुळे कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.