जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा – राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी , राज्य सरकारची शेतकरी विरोधी भूमिका – धैर्यशील पाटील यांचा आरोप

तामलवाडी येथे राष्ट्रवादीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

 तुळजापूर दि 25 प्रतिनिधी

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकारने काम केले पाहिजे पिक विमा तात्काळ दिला पाहिजे त्याचबरोबर दुष्काळ जाहीर करून मराठवाड्यातील शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी मागणी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे रस्ता रोकोप्रसंगी तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली  तामलवाडी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले  कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला.

 यावेळी तामलवाडी टोल प्लाझा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ येथे दोन्ही बाजूने शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच शेतकरी वर्ग रस्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले होते केंद्र शासनाने कांद्यावर ४०% निर्यात शुल्क लावलेला हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा  २०२०-२१, २०२१-२२ व २०२३ चा २५% आग्रीम पीक विमा तात्काळ  देण्यात यावा संपूर्ण जिल्ह्यामध्ये मागील २२ ते २३ दिवसापासून पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे तरी संपूर्ण जिल्ह्याला तात्काळ दुष्काळ जाहीर करावा  अशी मागणी तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी या आंदोलनाद्वारे केली आहे 

.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, वक्ता  सेल जिल्हाध्यक्ष ऍड अमोल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, प्रभारी विधानसभा अध्यक्ष सावंत शिवाजी रामकृष्ण (माजी सैनिक), राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा कार्याध्यक्ष विवेक शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष रुबाबभाई पठाण अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष तौफिक शेख, युवक तालुका अध्यक्ष संदीप गंगणे, शहराध्यक्ष अमर चोपदार, युवक तालुका कार्याध्यक्ष शरद जगदाळे, युवक उपाध्यक्ष अभिजित पाटिल, तामलवाडी ग्रामपंचायत सदस्य सतीश मच्छिंद्र माळी, हनुमंत बंडू गवळी, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष सिकंदर बेगडे, प्रशांत राऊत, शहाबुद्दीन कोतवाल, रजनीकांत जेटीथोर, किसन पंडागळे, चंद्रकांत डावरे, निळोबा गायकवाड, अलीम पीरजादे, गोपाळ डावखरे, बाळू डोंगरे,  शहाजी नन्नवरे, नजीब काजी, इब्राहिम इनामदार, अलीम शेख, गणेश गुंड, स्वप्नील काळे, विट्ठल गुंड, राजेंद्र बोचरे, रामदास गुंड, गजानन देशमुख, बबन हेडे, रामेश्वर लाडुळकर, शहाजी लाडुलकर, आप्पा बनसोडे, विनोद साबळे, समाधान देवगुंडे, उमेश पांडागळे, मारुती बेटकर, शशिकांत गोडसे, प्रभू माळी,  सूर्यकांत जोकर, मलका सोमवंशी, गफूर मुजावर, मोहम्मद मुजावर, रहीम मुजावर, अशियन मुजावर, अनिल शिंदे, विकास गायकवाड, अमीर शेख, मोहसीन सय्यद, महादेव कोटगिरे, विनायक जाधव तसेच असंख्य कार्यकर्ते व शेतकरी वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *