जिल्हा परिषदेच्या प्रशालेत शिक्षण घेणारा रुद्र श्रीकांत कावरे याचे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत निवड, जिल्हा परिषद प्रशालेची गुणवत्ता पुन्हा पुन्हा सिद्ध..

तुळजापूर :दि.(१) प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी इयत्ता पाचवी वर्गाचा विद्यार्थी रुद्र श्रीकांत कावरे यांनी सीबीएससी अभ्यासक्रम असणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये गमगलीत यश संपादन केल्याबद्दल त्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. पुन्हा एकदा जिल्हा परिषद शाळेमधील गुणवत्ता या यशा मधून सिद्ध झाली आहे.

येथील रुद्र श्रीकांत कावरे याची एप्रिल महिन्यात घेण्यात आलेली जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत निवड झाली आहे. जवाहर नवोदय विद्यालय समितीमार्फत सन २०२३ च्या इयत्ता ६ वी या वर्गाचे प्रवेशासाठी घेण्यात आलेली परीक्षेची दुसरी निवड यादी विद्यालयाचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून यामध्ये तुळजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी येथे इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी रुद्र श्रीकांत कावरे याची निवड झाली आहे.

सदर निवडीबद्दल त्याचा युवास्पंदन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा डाॅ. हेडगेवार रक्तपेढी सोलापूरचे संचालक महेंद्र कावरे, , संतोष कावरे, निरंजन डाके, स्वाती कावरे, अरुणा कावरे यांच्या हस्ते सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी दशरथ कावरे, सुमन कावरे, श्रीकांत कावरे, अपर्णा कावरे उपस्थित होते.
रुद्र कावरे यास स.शि. सुरेश राऊत व स.शि. रेखा डाके (राऊत) यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. रुद्र कावरे याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

सर्व तर खाजगी शाळेचे प्रश्न प्रतिष्ठा आणि द बद बा निर्माण झालेल्या असताना चव्हाणवाडी तालुका तुळजापूर येथील जिल्हा परिषदेच्या प्रशालेतील रुद्र कावरे यांनी जवाहर नवोदय विद्यालय या सीबीएससी अभ्यासक्रमाच्या परीक्षेमध्ये मिळवलेले घमघमीत यश लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या धाराशिव जिल्ह्यातील प्रशाला गुणवत्तेमध्ये कुठेही कमी नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये वारंवार अनेक स्पर्धात्मक परीक्षांमध्ये जिल्हा परिषद प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी आपली यश दाखवून दिलेले आहे केवळ राजकीय उदासीनता असल्यामुळे जिल्हा परिषद प्रशालेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यामध्ये कुचराई दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *