जिल्हा परिषद प्रशाला गोंधळवाडी येथे पर्यावरण पूरक गणपती निर्माण कार्यशाळा

तुळजापूर दिनांक 17 प्रतिनिधी

वसा पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचा

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील गोंधळवाडी तालुका तुळजापूर येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये शेकडे विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणपती निर्माण कार्यशाळेमध्ये उत्साहात सहभाग नोंदवला .जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंधळवाडी ता. तुळजापूर येथे ‘पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करणे’ याची कार्यशाळा शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती जयमाला शिरीष वटणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली घेतली.

मूर्ती कशी करावी? करताना मातीची तयारी,विविध माती, मातीचे प्रकार व त्यांचे गुणधर्म विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. यातून मूर्ती बनवताना विविध आकार, मातीचे गोळे तयार करून त्यातून सुंदर अशी मूर्ती तयार करणे ही संकल्पना त्यांनी प्रात्यक्षितांतून विद्यार्थ्यांना समजून सांगितली.

आपल्या परिसरातील शाडू माती ,काळी माती यांचा वापर करून सुबक आणि कोरीव अशा गणेश मुर्ती करणे ही काळाची गरज आहे ही जाणीव करून दिली. विद्यार्थ्यांनी सुंदर व सुबक अशा पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करून त्याच स्वतःच्या घरी प्रतिष्ठापना करण्याची शपथ घेतली. सुरवात स्वतःपासून केली तर नक्कीच आजूबाजुचा समाज बदलेल व प्रत्येकाच्या घरी दरवर्षी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती असेल. या उपक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना ‘पर्यावरण पूरक गणेश मूर्ती काळाची गरज’ यावर निबंध लेखन ही करण्याचे संकल्पना देण्यात आली.


हल्ली बाजारात उपलब्ध असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती व त्याचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम प्रदूषण या सर्व गोष्टींचे विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. या उपक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री.प्रमोद पिंपळे, शिक्षक नेते श्री.लालासाहेब मगर,श्री. व्यंकट तोटावाड, श्री शंकर राऊत, श्री बोधगिरे, श्रीम.भुसे मंजुषा श्रीम. अर्चना राठोड यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *