जीजामाता नगर मध्ये सुरू झाले, “लाडकी बहिण” योजनेसाठी मदत कक्ष, मोठा प्रतिसाद,पहिल्या दिवशी ७०० महिलांचे कामकाज

माजी नगराध्यक्ष सौ.अर्चनाताई गंगणे यांच्या हस्ते लाडकी बहिण मदत कक्षाची सुरूवात 

तुळजापूर दिनांक ६ पुढारी वृत्तसेवा 

तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या लाडली बहन योजना याचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा यासाठी जिजामाता नगर परिसरात विशेष पक्षाची सुरुवात तुळजापूरच्या माजी नगराध्यक्ष सौ अर्चनाताई गंगणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी युवक नेते विनोद गंगणे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

 माजी नगराध्यक्ष सौ अर्चनाताई गंगणे यांच्या शुभहस्ते तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि या योजनेच्या मदत कामाला सुरुवात करण्यात आली. महिलांचे बँक खाते  काढून  देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच फोटो, आधार कार्ड,मतदान ओळख पत्र झेरॉक्स याबाबात या नोंदणी कक्षामध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जाईल असे आव्हान देखील केले  जिजामाता नगर मधील महिलांना फॉर्म भरण्याकरिता लखन पेंदे , संतोष इंगळे , बबलू महाडिक रामेश्वर सुर्यवंशी यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे. परिसरातील महिला मोठ्या संख्येने लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन अर्जासाठी येथे आल्या होत्या.

लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक मदत करण्यासाठीं आमदार राणा जगजितसिंह पाटील यानी महत्त्वाच्या सूचना दिल्या असून कोणतीही महीला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी हा कक्ष सुरू केल्याची महिती देऊन  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी राज्य सरावर घेतलेला हा ऐतिहासिक निर्णया असून याचा लाभ गोरगरीब महिला वर्गांना होणार आहे. तुळजापूर शहरांमध्ये या योजनेचा लाभ देण्यासाठी महिला वर्गाला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी या मदत कक्षाची सुरुवात केली आहे अशी माहिती या निमित्ताने युवक नेते विनोद गंगणे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *