तुळजापूर दि- 26 न्यूज मराठवाडा प्रतिनिधी
टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर व सामाजिक वनीकरण विभाग, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
या वृक्षारोपण कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल, कुलकर्णी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे उप संचालक प्रो. रमेश जारे, विभागीय वनाधिकारी, आर आर चोबे,आरएफओ पंचरंडे, टाटाचे गणेश चादरे, डॉ. संपत काळे, डॉ. श्रीधर सामंत, राम राठोड, आनंद भालेराव, शंकर ठाकरे, आरओ शहाजी देशमुख, ऋषभ चौधरी, कोहिजनचे डॉ दयानंद वाघमारे, टाटाचे विद्यार्थी, कर्मचारी सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मियावॉकी मध्ये फळांची, फुलांची,वनौषधी व दुर्मिळ अशा देशी प्रजातीच्या 13200 वृक्षांची लागवड म्हणजे मानवाबरोबरच निसर्गातील पशुपक्षी, वन्यप्राणी व जीवजंतू यांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन बरोबरच सर्वच घटक या वनामध्ये असल्यामुळे हे घनवन सर्वांसाठी जीवनदायिनी असल्याचे अतुल कुलकर्णी यांनी सांगितले. या प्रसंगी, प्रो. रमेश जारे म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये प्रामुख्याने पर्यावरण संवर्धन या विषयाला महत्वपुर्ण स्थान प्राप्त झाले आहे.
टिस हे पहिले विद्यापीठ आहे. ज्यांनी सर्वात प्रथम मियावॉकी घनवनाची उभारणी केली आहे. या प्रसंगी, शहाजी देशमुख यांनी मियावॉकी वृक्षलागवड संकल्पना व त्याचे महत्व सांगितले. या प्रसंगी संपत काळे म्हणाले की, पर्यावरण अभ्यासाठी विद्यार्थ्याना हे मियावॉकी घनवन मार्गदर्शक ठरणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी, श्री. गणेश चादरे म्हणाले की, निसर्ग हा आपल्या सर्वांचाच आहे
आपण सर्वचजन निसर्गाचे आहोत. त्यामुळे प्रत्येकांनी निसर्गाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे . वृक्ष लागवडी बरोबरच त्याचे योग्य संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्याना वृक्ष दत्तक देण्यात येणार आहेत. प्रत्येक वृक्षाला विद्यार्थ्याचे नाव देण्यात येणार आहे. वृक्ष लागवड व संवर्धन स्पर्धा अंतर्गत जो विद्यार्थी आपल्या झाडाचे योग्य संगोपन करेल त्याला प्रमाणपत्र देवून त्याचा सन्मान ही करण्यात येणार असल्याचे गणेश चादरे यांनी सांगितले व सामाजिक वनीकरण विभागाने मियावॉकी घनवन करण्यासाठी टाटा संस्थेची निवड केल्याबद्दल त्यांचे व याकार्यामध्ये बालाजी आमईन्सचे हे मोलाचे योगदान असल्याबद्दल त्यांचे ही आभार व्यक्त केले. याप्रसंगी, ग्रीन यात्री संस्था मुंबईचे मियावॉकी तज्ञ ऋषभ चौधरी यांनी ही वृक्ष लागवडीचे महत्व सांगितले. या प्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम राठोड यांनी पर्यावरण विषयक घोषणा देवून विद्यार्थ्यामध्ये नव चेतना निर्माण केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टाटाचे गणेश चादरे, आनंद भालेराव, शंकर ठाकरे, सर्व विद्यार्थी सामाजिक वनीकरण विभागाचे शहाजी देशमुख व त्यांच्या सर्वच कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.