राज्यस्तरीय टेंग सुडो कराटे स्पर्धेत अजिंक्यपद साताऱ्याकडे धुळे उपविजेता
तुळजापूर दिनांक 18 डाॅ. सतीश महामुनी
शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ शामलताई वडणे यांनी दुसऱ्या वर्षी तुळजापूर येथे तेंग सु डो या कोरियन कराटे खेळाचे राज्यस्तरीय सामने भरविले आणि या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यांमधून 500 विद्यार्थी खेळाडू तुळजापुरात दाखल झाले आणि येथील श्रीनाथ मंगल कार्यालय परिसरात अक्षरशः राज्यभरातून आलेल्या या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करीत भल्या मोठ्या आठ फूट उंचीच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले, साताराहून आलेल्या बहाद्दर खेळाडूंनी या ट्रॉफीचा स्वीकार धाराशिव जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या हस्ते केला. बक्षीस वितरण सोहळ्यासाठी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आणि धाराशिव चे माजी नगराध्यक्ष नंदू राजे निंबाळकर यांची उपस्थिती होती उद्घाटनाची क्रीडाजोत जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रज्वलित केली
तीन दिवस सुरू असलेल्या राज्यस्तरीय तेंग सुडो कराटे स्पर्धेमध्ये सातारा संघाने विजेतेपद पटकावले असून उपविजेते पदावर धुळे आणि धाराशिव संघाला यश प्राप्त झाले आहे विजेत्या संघाला माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. 28 जिल्ह्यांमधून 500 खेळाडू तुळजापुरात या स्पर्धेमध्ये उतरले होते.
धाराशिव जिल्हा तेंग सु डो कराटे असोसिएशन तर्फे तुळजापूर येथे दहावी राज्यस्तरीय तेंग सु डो (कोरियन कराटे) अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, शि.वसेना सहसंपर्क प्रमुख नंदूराजे निंबाळकर,स्पर्धेच्या मुख्य आयोजक शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शामल वडणे पवार यांच्याहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ऍड. धीरज पाटील,शिवसेना लातूर सहसंपर्कप्रमुख संतोष सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील,प्रतीक रोचकरी,अमोल कोतवळ, सुनील जाधव,सुरेखा मुळे, श्याम पवार, बाळासाहेब शिंदे, संजय पारवे,किरण व्हरकट, संजय पाटील, राजेश बिलकुले,स्पर्धेचे राज्यअध्यक्ष रॉकी डिसुझा,महासचिव मास्टर सुभाष मोहिते, जिल्हाध्यक्ष मास्टर महमदरफी शेख आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी तर आभार शाम पवार यांनी मानले.
तुळजापुरात पार पडलेल्या स्पर्धेतील वैशिष्टे….
– 24 जिल्ह्यातील जवळपास 500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. विजेता आणि उपविजेता यांच्यासाठी आठ फूट उंचीच्या बलाढ्य ट्रॉफी देण्यात आल्या.
– तुळजापुरात करण्यात आलेले स्पर्धेचे नियोजन आणि भोजन व्यवस्था या संदर्भात बाहेरगाहून आलेल्या संघांनी आयोजकांचे कौतुक केले
– सतत तुळजापूर येथे तीर्थक्षेत्र असल्यामुळे भाविकांची गर्दी असते परंतु मागच्या तीन दिवसापासून कोरियन कराटे स्पर्धा तुळजापुरात होत असल्यामुळे खेळाडूंची खूप मोठी गर्दी आणि नेतृत्व स्पर्धा तुळजापूरकरांना अनुभवता आली अत्यंत चांगले देखणे आयोजन तुळजापूरकरांनी केले होते त्याचे कौतुक मुंबई आणि पुणे त्याचबरोबर नाशिक आणि सातारा येथील संघप्रमुखांनी केले
सोलापूरच्या संघप्रमुखांनी राज्यभरात आम्ही विविध स्पर्धा करतो येथे करण्यात आलेली निवासव्यवस्था आणि भोजन व्यवस्था अत्यंत दर्जेदार होती असे मनोगत व्यक्त केले तसेच आम्ही शालेय जीवनामध्ये तुळजापूर येथे स्पर्धेसाठी आलो होतो आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या महाद्वारासमोर झालेली महाआरती आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे अशा शब्दात स्पर्धेमध्ये अजिंक्य ठरलेल्या सातारा संघातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले