महाविकास आघाडीच्या वतीने तुळजापूर दुष्काळाच्या प्रश्नावर आंदोलन
तुळजापूर दि ७ वृत्तसेवा
महाविकास आघाडी ,शेतकरी कामगार पक्ष, जनहित संघटना यांच्या वतीने तुळजापूर तालुक्यामध्ये दुष्काळ तातडीने जाहीर करावा या मागणीसाठीलाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. तालुका तात्काळ दुष्काळ ग्रस्त यादीत समाविष्ट करण्याची यानिमित्ताने मागणी.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात ९० टक्के तालुके दुष्काळ म्हणून जाहीर केले आहे, परंतु तुळजापूर तालुका हा अत्यंत पाऊस कमी झाला आहे. तालुक्यामध्ये सध्य परिस्थितीमध्ये काही गावांमध्ये टँकर चालू आहे त्यामुळे तात्काळ दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने तुळजापूर येथे तहसील कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये केली आहे
सर्वसामान्य शेतकरी मजूर, कामगार यांचा रोजी रोटीचा अत्यंत बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.
तुळजापूर तालुका हा संपूर्ण पावसावर अवलंबून असून यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे दुष्काळ परिस्थिती असून सुद्धा केंद्र सरकारच्या जाचक अटीमध्ये न बसल्यामुळे राज्य सरकारने तुळजापूर तालुका दुष्काळ यादीतून वगळ आहे तरी महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करीत आहोत त्याचबरोबर सरसकट शेतकऱ्यांना मदत तसेच सोयाबीन दूध या पिकासह सर्व पिकांचे हमीभाव केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे तसेच सर्व प्रकारच्या पिक विम्याची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांना मिळावी, घरगुती वापरातील गॅस डिझेल व पेट्रोलच्या वाड्याला किमती कमी कराव्यात, अन्यथा येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडी तर्फे आंदोलन छेडण्यात येईल याची सरकारने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी या आंदोलनाच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली
स्थानिक आमदार यांना माहिती असूनही त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष करून एक प्रकारे तुळजापूर तालुक्यावर अन्याय केला असून महाराष्ट्र शासनाचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तुळजापूर तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करून तालुक्यातील तमाम जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी याप्रसंगी केली.
. यावेळेस महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, युवक नेते ऋषिकेश मगर, अमोल कुतवळ. अशोकराव मगर, श्याम पवार, सुनील जाधव, चेतन बंडगर, राहुल खपले, अजय साळुंखे, .आकाश शिंदे. हरी कांबळे. काजी अत्तर .आनंद जगताप. अमोल जाधव, बाळासाहेब शिंदे, सुदर्शन वाघमारे, .विकास भोसले, शरद जगदाळे, .शहाजी कसबे, राजाराम जाधव, शशिकांत मुळे, .हेमंत कांबळे, दयानंद राठोड, संदीप कदम, शेख तौफिक, संदीप गंगणे, रणजीत इंगळे, .शहाजी नन्नवरे,रामेश्वर घोगरे ,माणिक गरड ,भरत जाधव, .नितीन कदम ,.तुकाराम सपकाळ,. विनायक पाटील, .नवनाथ भरले ,रामचंद्र ढवळे, श्रीकांत धुमाळ, प्रदीप कदम ,.युवराज साठे .विशाल साळुंखे. चेतन पांडागळे. नवनाथ जगताप, .नशीब शेख .दीपक पाटील. बालाजी पांचाळ. इत्यादी तालुक्यातील तमाम शेतकरी वर्ग व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बारामती जुन्नर यासारखे अत्यंत प्रगत आणि शेतीसाठी मुबलक पाणी असणारे तालुके दुष्काळग्रस्त यादीत असताना कुसली गवताचा तुळजापूर तालुका दुष्काळग्रस्त यादीत नसणे चुकीचे आहे ही बाब काँगेस जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील यांनी यावेळी दाखऊन दिली. तर स्थानीक आमदार यांनी दुर्लक्ष केल्याने तालुका या यादीत आलेला नाहीं, शेतकरी दिवाळी सणात कंगाल झाला आहे त्याचा दुष्काळ ग्रस्त असलेल्या मदतीपासून वंचित ठेवू नये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुळजापूर तालुक्याला पाहणी करण्यासाठीं दौरा करावा अशी मागणी युवां नेते ऋषिकेश मगर यांनी केले. शिवसेना नेते शाम पवार, राष्ट्रवादी नेते संदीप गंगणे, शेकाप नेते राहूल खपले आणि महा विकास आघाडीचे नेते यावेळी उपस्थित होते.