तुळजापूर दि 20 प्रतिनिधी
तुळजापूर येथील व्यापारी दत्तात्रय पाटील यांच्या सून ॲड. मंजुषा योगेश कुलकर्णी पाटील यांची सरकारी सहाय्यक अभियोक्ता पदी निवड महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने झाली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून त्यांची सरकारी विधीज्ञ म्हणून निवड झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव करण्यात येत आहे.
तुळजापूर येथील विश्वास नगर येथील रहिवासी व्यापारी दत्तात्रय पाटील यांच्या सुन दयानंद कॉलेज सोलापूर येथे त्यांचे शिक्षण झाले त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगा ची परीक्षा त्या नुकत्याच उत्तीर्ण झाल्या आहेत, यातून त्यांची शासकीय सहाय्यक अभियोक्ता (गट-अ) म्हणून निवड झाली आहे. याबाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. शालेय आणि महाविद्यालय जीवनामध्ये त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याच्या अनुषंगाने मानसिकता केलेली होती त्याप्रमाणे त्यांनी लग्नानंतर देखील आपला अभ्यासाचा व्यासंग सुरू ठेवला आणि नुकत्याच यावर्षी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये त्यांनी हे यश त्यांनी संपादन केले आहे. नातेवाईक मित्रपरिवार आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे या निमित्ताने अभिनंदन केले आहे.
प्रतिक्रिया
पाटील परिवारासाठी ही खूप आनंदाची आणि गौरवाची बाब आहे. मंजुषा हिने आपल्या प्रयत्नांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये हे यश संपादन केले हे या यशाचे वैशिष्ट्य आहे. आमच्या सर्व नातेवाईकांनी कुटुंब परिवारामध्ये हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे तिच्या हातून समाजाचे आणि प्रशासकीय पातळीवर उत्तम सेवा घडो ही तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना आहे. ( सासरे तथा उद्योजक – दत्तात्रय पाटील महाद्वार रोड तुळजापूर )
यश संपादन केले