मागील पाच वर्षांमध्ये तुळजापूर विधानसभा क्षेत्रामध्ये महायुती सरकारने मोठा निधी दिला – आमदार राणाजगजितसिंह पाटील
तुळजापूर दिनांक 25 प्रतिनिधी
या विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून आपण मागील पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारचा निधी प्राप्त केला आहे त्याचबरोबर तालुक्यातील प्रलंबित मोठ्या योजनांसाठी मंजुरी मिळवली आहे अशी माहिती आमदार राणा जगजितसह पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
तुळजापूर येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार राणा जगदीश सिंह पाटील बोलत होते. याप्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती सचिन पाटील, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजीं जि प सदस्य राहुल पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले, नरेश अमृतराव, निलेश रोचकरी शहराध्यक्ष शांताराम पेंदे, युवा मोर्चा शहराध्यक्ष राम चोपदार, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
तुळजाभवानी मंदिर विकासासाठी 60 कोटी रुपयांची मंजुरी घेतलेली आहे, नळदुर्ग येथील तहसील कार्यालयाचे मान्यता देखील प्राप्त झालेली आहे, तामलवाडी एमआयडीसी प्रगतीपथावर आहे, कवडगाव एमआयडीसी प्रगतीपथावर आहे, माकरी धरणाची दुरुस्ती करण्यासाठी 112 कोटी निधी मंजूर झाला आहे, कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेसाठी राज्य शासनाने चांगली मदत केली असून डिसेंबर महिन्यामध्ये रामदारा तलावात पाणी पडणार असल्याची माहिती या पसंगी आमदार पाटील यांनी पत्रकारांना दिली.
या पत्रकार परिषदेमध्ये आमदार पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेले सिंचनाचे काम आजही जनतेसमोर आहे जिल्ह्यामध्ये वाढलेली साखर कारखानदारी त्याचाच परिणाम आहे. 11 हजार 700 कोटी रुपये तालुक्यातील सिंचनाच्या कामासाठी मंजूर झाले असून तुळजापूर नंतर हे पाणी उमरगा लोहारा भूम परंडा वाशी आणि धाराशिव असे सर्वत्र दिले जाणार आहे त्याचे नियोजन प्रस्तावित आहे. टेक्निकल टेक्सटाईल पार्क हा आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्पापासून 24 कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहे. याशिवाय 2014 मध्ये घोषित झालेला रेल्वे प्रकल्प देखील प्रगतीपथावर आहे. बसवसृष्टी नळदुर्ग वसंतराव नाईक पुतळा नळदुर्ग येथील शादी खाना तुळजापूर येथील अहिल्यादेवी होळकर पुतळा अशा सर्व कामांना प्रशासकीय मान्यता घेतलेली आहे. विरोधक प्रशासकीय मान्यतेचे राजकारण करत आहेत जनतेने अशा चुकीच्या टीका टिप्पणी कडे दुर्लक्ष करावे असे आवाहन याप्रसंगी आमदार पाटील यांनी केले.
तुळजाभवानी मंदिर विकास 60 कोटी रुपयांचे कामाला मान्यता मिळाली आहे यामध्ये दक्षिण उत्तर मंदिर विस्तारित होत आहे याशिवाय मंदिराच्या सर्व बाजूंनी विस्तार होऊन मंदिर वावरण्यासाठी मोठे होणार आहे याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चार कोटी रुपयांची स्वागत कमाल होणार आहेत अशा चार स्वागत कमानी शहरांमध्ये आणि चार कमानी महामार्गावर होत आहेत अशी देखील माहिती या पसंगी आमदार पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.