तुळजापूर तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांची बैठक
तुळजापूर दिनांक १४ प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांची सामाजिक व राजकीय विषयांवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी अँड रामचंद्र ढवळे, हे होते. सामाजिक कार्यकर्ते परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष मारुती बनसोडे परिवर्तन,आर.एस.गायकवाड,
रंगनाथ डोलारे, संजय नाना शितोळे, मोतीराम चिमणे यांच्यासह इतर मान्यवर या प्रदीर्घ बैठकीस उपस्थित होते
एडवोकेट रामचंद्र ढवळे मारुती बनसोडे आर एस गायकवाड रंगनाथ डोलारे संजय नाना शितोळे मोतीराम चिमणे, पाराप्पा थोरात ,धम्मपाल रणसुरे, धम्मशिल कदम, पत्रकार दादा बनसोडे ,अरुण लोखंडे,एस,के, गायकवाड, शामकांत नागिले, जय भीम वाघमारे, शशिकांत गोरसे, विनोद जाधव, महादेव सुरवसे, गोवर्धन दुपारगुडे यांच्या सह अनेक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य या बैठकीला उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविकात मारुती बनसोडे यांनी सध्या मागासवर्गीय (बौद्धांना) राजकारणातचं नव्हेतर, प्रत्येक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना, पक्षाचे क्षेठीय लोक किंवा उमेदवार वरिष्ठांना डावलून आपणास गृहीत धरून वापरले जाते.यासाठी आपण आपल्या समाजजाच्या वतीने दबाव गट निर्माण करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याने किमान आपल अस्तित्व टिकवणे आपलं कर्तव्य म्हणून या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले , समाज बांधवांनी आपल्या राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी समाजातील पुढारलेले लोक जबाबदार आहेत.त्यांनी आपल्या कृतीतून आपल्या पक्षाच्या बॅनरखाली कामं करायचं पण आपलं त्या पक्षाच्या उमेदवारांना आणि पक्षाचे धोरण चालवण्यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या प्रतिष्ठा जपण्यासाठी आपण यापुढे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांची दखल घेऊन राजकारण करण्याची गरज आहे असे या बैठकीत सर्वानुमते ठरले..
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक मारुती बनसोडे यांनी केली