तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रहार पक्षाचे आण्णासाहेब दराडे यांच्या प्रचाराला गती, युवक मित्रांचा चांगला प्रतिसाद

तुळजापूर दिनांक १३ डॉक्टर सतीश महामुनी

तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचारातील चुरस शिगेला पोहोचली आहे यादरम्यान प्रहार पक्षाचे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनीही आपला प्रचार अधिक गतिमान करून ग्रामीण भागामध्ये आपली लोकप्रियता वाढवली आहे.

कोणतीही मोठी जाहीर सभा न घेता आपण प्रत्यक्ष जनसंपर्कावर वर दिला आहे अगदी मागच्या महिन्याभरापासून आपण प्रत्येक गावाला घरोघरी लोकांना भेटून आपली भूमिका सांगत आहोत विद्यमान आमदार आणि मागील कार्यकाळात आमदार म्हणून काम केलेल्या नेत्यांच्या कामाची चर्चा या निमित्ताने होत आहे लोक या सर्व नेत्यांना कंटाळले आहेत जनतेच्या अपेक्षा पूर्ण न केल्यामुळे जनता नव्या उमेदवाराच्या शोधात आहे निवडणुका आजकाल ज्या पद्धतीने संपन्न होत आहेत हे लक्षात घेता लोकशाही धोक्यात आली आहे असे देखील या निमित्ताने प्रहार पक्षाचे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी सांगितले आहे.

आज कुठला बुधवार आहे बुधवारी सकाळ पासून भातंबरी, मंगरूळ, कुंभारी, देवकुरुळी, काटगाव, दिंडेगाव, काळेगाव, आरळी बू. येथे मायबाप जनतेशी दारोदारी जाऊन संवाद शोधला वयोवृद्ध लोकांचे आशीर्वाद घेतले तरुण मित्रांना देखील सोबत घेण्याचा प्रयत्न केला माझी तीन वर्षाची मुलगी कु. धनिष्ठा अण्णासाहेब दराडे आणि पत्नी सौभाग्यवती दराडे हे सर्व कुटुंब प्रचारामध्ये गुंतले आहे तीन वर्षाची मुलगी देखील प्रचार करताना पाहून लोकांना आश्चर्य वाटते आहे परंतु लोकशाहीची ही मोठी किमया आहे प्रत्येकाला दिलेला अधिकार आज आपण उपयोगात येताना दिसतो आहे त्यामुळे गाव गाव भेटणाऱ्या प्रत्येक माणसाचे प्रत्येक तरुणाचे प्रत्येक महिला भगिनीचे मत जाणून घेऊन पुढच्या काळामध्ये समाजकारण आणि राजकारणामध्ये काम करावे लागणार आहे दशा आणि दिशा याबाबत बोलताना अण्णासाहेब दराडे म्हणाले की आजची राजकीय परिस्थिती आणि राजकारणाची दिशा लक्षात घेतली तर निश्चितपणे नव्या उमेदवाराला लोक चांगला प्रतिसाद देत आहेत परंतु प्रचलित राजकारण ज्या पद्धतीने होते आहे त्यामुळे काही अडथळे आहेत परंतु या सर्व अडचणींना दूर करून आपण निश्चित विजयी होऊ असा विश्वास देखील प्रहार पक्षाचे उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी व्यक्त केला आहे. गावोवागी जाऊन प्रचार करत असताना वाढती बेरोजगारी हा खूप मोठी अडचण आहे तरुणांनी शिक्षण घेतल्यानंतर त्याला नोकरी करण्यासाठी नोकरी शिल्लक नाहीत किंवा नोकऱ्या शिल्लक असल्या तरी त्या भरल्या जात नाहीत आणि या नोकऱ्या न भरल्यामुळे शिकलेले तरुण देखील बेरोजगार म्हणून फिरत आहेत त्यामुळे त्यांचे कौटुंबिक स्वास्थ बिघडले जाते आहे या सामाजिक समस्येकडे कोणताही राजकीय पक्ष पाहत नाही म्हणून आपण प्रहार पक्षाच्या वतीने युवकांची भूमिका समजून घेऊन पुढील काळामध्ये युवकांच्या भवितव्यासाठी काहीतरी भरीव काम करण्याचा निश्चय या निवडणुकीच्या दरम्यान केला आहे असे देखील यावेळी अण्णासाहेब दराडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *