तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय बंद होणार नाही- आनंद कंदले यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती,

तुळजाभवानी कौशल्य विकास विद्यापीठ हा शिक्षण क्षेत्रातील खूप मोठा प्रकल्प आहे, आपल्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे वेगवेगळे अभ्यासक्रम या विद्यापीठ अतर्गत शिक्षण आणि नोकरीसाठी तुळजापुरात उपलब्ध होतील

तुळजापूर दिनांक २३ वृत्तसेवा 

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अभियांत्रिकी महाविद्यालय त्याही परिस्थितीत बंद होणार नाही, त्याला जोडून श्री तुळजाभवानी स्किल विद्यापीठ निर्माण होत आहे त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये अशी माहिती भाजप युवा मोर्चा अध्यक्ष आनंद कंदले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. कौशल्य विकास विद्यापीठ या परिसरातील तरुणांना नव्या युगाचे शिक्षण देणार आहे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे त्या माध्यमातून ते संपूर्ण मतदारसंघातील लोकांना शिक्षणाच्या पातळीवर आधुनिक बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत येथे तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय बंद करण्याचा विषय नाही हे महाविद्यालय पूर्ववत सुरूच राहणार आहे त्यामुळे कोणीही या अनुषंगाने गैरसमज करून घेऊ नये असे महत्त्वपूर्ण आवाहन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले.

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, माजी उपनगराध्यक्ष सुहास साळुंखे, भाजप नेते नरेश अमृतराव, भाजपा शहराध्यक्ष शांताराम पेंदे यांची उपस्थिती होती. महाविकास आघाडी कडून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, शिवसेना नेते श्याम पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्यासह इतर नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार राणा जगजितसह पाटील यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करताना तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय बंद करून तेथे विद्यापीठ स्थापन करण्याचा मनसुबा जाहीर केला आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये एक अभियांत्रिकी महाविद्यालय बंद करू नये अशी भूमिका जाहीर केली त्यानंतर आमदार राणा जगजितसह पाटील यांच्या अनुषंगाने भूमिका व्यक्त करण्यासाठी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद कंदले, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषद बोलावून महाविकास आघाडीचा आरोप खोडून टाकला. कोणत्याही परिस्थितीमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय बंद होणार नाही हा आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांचा शब्द आहे असे पत्रकार परिषदेमध्ये सांगून धाराशिव जिल्ह्यातील तरुणांना कौशल्य विकासावर आधारित शिक्षण देण्यासाठी श्री तुळजाभवानी कौशल्य विकास विद्यापीठ नव्याने स्थापन केले जात आहे यामध्ये महाविद्यालय बंद करण्याचा विषय येत नाही हे नियमित महाविद्यालय या विद्यापीठांतर्गत सुरूच राहणार आहे त्यामुळे अपप्रचार आणि गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले.

या पत्रकार परिषदेमध्ये युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले व माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय बंद होणार नाही याविषयी कोणीही शंका घेऊ नये तसेच आमदार राणा जगजितसह पाटील हे तुळजाभवानी स्किल विद्यापीठ या महाविद्यालयाला जोडून निर्माण करीत आहेत अशी माहिती दिली. अभियांत्रिकी, एम बी ए बी एस सी आर्किटेक आयटीआय आणि वेगवेगळे डिप्लोमा कोर्सेस या विद्यापीठामार्फत चालवले जाणार आहेत .ज्याच्यामुळे आपल्या भागातील मुलांना कौशल्य विकास शिक्षण मिळणार असून त्यामधून नोकऱ्या मिळणार आहेत. या विद्यापीठामुळे तुळजापूरच्या दर्जा वाढेल आणि जगाच्या पातळीवर सुरू असलेले अभ्यासक्रम विद्यार्थ्याला शिकता येतील, राजकीय भावनेने केलेल्या आरोप चुकीचे आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविद्यालय बंद होणार नाही असा दावा आनंद कंदले यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आला. जर महाविद्यालय बंद होणार असेल तर त्याला माझा पहिला विरोध असेल असे याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.

माजी उपनगराध्यक्ष सुहास साळुंखे यांनीही या पत्रकार परिषदेमध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून तुळजापूरच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला जातो याप्रसंगी त्यांनी शहर आणि तालुक्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये महाविद्यालय बंद होणार नाही याचा पुनरुच्चार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *