बेंबली दिनांक एक प्रतिनिधी
बेंबळी येथे महिलांसाठी चार दिवसीय दुग्ध व्यवसाय व प्रशिक्षण अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. रूईभर येथील दुग्ध व्यवसायिक खोंदे यांच्या फार्म हाऊस वर मुक्त संचार गाई गोठण्याची पाहणी करून एक सहलीचा समारोप करण्यात आला. महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाच्या या प्रशिक्षणामध्ये महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला ग्रामीण भागाचे अर्थकारण दुग्ध व्यवसायावर गतिमान होऊ शकते आणि या व्यवसायामध्ये महिलांना काम करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे असे या प्रशिक्षणा दरम्यान दिसून आले आहे.
ग्रामीण समुदाय समग्र विकास कार्यक्रम संपदा ट्रस्ट अहमदनगर वॉटर संस्था उमेद अभियान अर्थसाह्य इंडसइंड बँक सोबत संपदा ट्रस्ट गेली चार दिवस खामसवाडी , केशेगावं, शिंदेवाडी येथील महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी डॉ . गवळीसर आणि जिल्हा समन्वयक विकास गोफणे आणि वॉटर संस्थेचे तालुका सम्वयक अनिल हिवाळे आणि उमेद प्रभाग समन्वयक अमोल खवले यांनी दुग्ध व्यवसाय विषयावर मार्गदर्शन करून शासकीय योजनांची व विविध महामंडळ योजनांची प्रशिक्षक 36 लाभार्थी यांना सविस्तर माहिती दिली तसेच दुग्ध व्यवसाय विषयावर ग्रामीण भागात ज्या त्या भागातील नियोजित ठिकाणी नियोजन प्रमाणात मुक्त संचार गाईगोठा मध्ये विविध प्रजातीचे संगोपन केले जाते म्हणून अंतरगाव मध्ये संकरित जर्सी गाई साठी हवामान चांगले मानवते म्हणून जास्तीत जास्त शेतकरी बंधू भगिनींनी मुक्त संचार गाईगोठा मध्ये दुग्ध व्यवसाय करून शाश्वत उपजीविकेचा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
या कार्यक्रमासाठी संपदा ट्रस्टचे तालुका समन्वयक प्रमोद गायकवाड यांनी नियोजन करून ग्रामीण भागातील गरजू महिलांपर्यंत विविध प्रशिक्षण पोहोचण्यासाठी मेहनत घेत आहेत. जिल्हा समन्वय विकास गोपने तालुका प्रमोद गायकवाड आणि उद्योग सखी सरस्वती कोळगे मनीषा कोळगे यशोदा गायकवाड, विद्या साळुंखे, रेश्मा परमार व महिला उपस्थित होते.
धाराशिव जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये दुग्ध व्यवसायाला खूप मोठ्या प्रमाणावर वाव आहे. मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय करण्यासाठी येथे महिलांना देखील चांगली स्पेस आहे शासनाच्या चांगल्या योजनांचा उपयोग करून महिला हा व्यवसाय अगदी सहजपणे ग्रामीण भागात करू शकतात आणि अर्थकारणामध्ये आपली महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात अशा प्रकारचे महत्त्वाची भूमिका समोर ठेवून या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते परिसरातील महिलांनी या प्रशिक्षणामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवल्यामुळे आयोजन करणाऱ्या संस्थेचे देखील पाठबळ वाढले असल्याचे दिसून आले.