दुष्काळी भागाला पाणी देण्याचे काम फक्त काँग्रेसने केले , जिल्ह्याचे सिंचन क्षमता वाढवली – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण
तुळजापूर दिनांक 4 डॉ. सतीश महामुनी
काँग्रेस पक्षाच्या प्रमुख निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आग्रह लक्षात घेऊन आपण आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या वतीने लढवणार असून 21 टीएमसी पाण्यासाठी यापूर्वीचा संघर्ष केला तो संघर्ष पुढेही चालू राहील आगामी विधानसभेमध्ये निश्चित जनतेचा आवाज बुलंद करू असे प्रतिपादन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले. धाराशिव जिल्ह्याची सिंचन क्षमता वाढवण्यासाठी राज्य शासन कृष्णा खोरे विकास महामंडळ, मराठवाडा वैज्ञानिक विकास महामंडळ यांच्या निधीमधून 77 साठवण तलावाची उभारणी केली परिणामी दुष्काळी भागाला बागायतदार करण्याची किमया साध्य झाली. हेच पाण्याची काम येणाऱ्य विधानसभा निवडणुकीत आपण जनतेसमोर मांडू असा विश्वास या निमित्ताने सत्काराला उत्तर देताना व्यक्त केला.
तुळजापूर येथील श्रीनाथ लॉन्स येथे आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नेते महादेवप्पा आलुरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामचंद्रआलूरे, राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य अशोक जगदाळे, राष्ट्रवादी युवतीि प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, डॉ स्मिता शहापूरकर, जि प माजी सभापती मुकुंद डोंगरे, माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, भागवत धस,अशोक मगर, माधव कुतवळ, अमर मगर, ऋषीकेश मगर, सुजित हंगरकर, माजी पं.स.सभापती शिवाजी गायकवाड, सयाजीराव देशमुख, गौरीशंकर कोडगिरे, लक्ष्मण सरडे,अशोक शिंदे,सुभाष हिंगमिरे,भारत काटे, महादेव सुरवसे, बालाजी आधटराव, शैलेश पाटील, शाहूराजे शिंदे, सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत, आशिष मदने, धनंजय रणदिवे, मधूकर तावडे , रहमान काजी, शहाबाद काजी, राष्ट्रवादी चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे, राष्ट्रवादी धाराशिव जिल्हाध्यक्ष महेंद्र धूगगुडे, गोकुळ शिंदे, दिलीप भोकरे गोकुळ शुगर फॅक्टरी चे चेअरमन दत्ता शिंदे, माजी नगरसेवक सुनील रोचकरी,ॲ॑ड. रामचंद्र ढवळे, प्रकाश चव्हाण,बालाजी बंडगर, सिद्रम मुळे,दिलीप सोमवंशी, तानाजी जाधव यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
याप्रसंगी विश्वास शिंदे, अशोक मगर, मुकुंद डोंगरे, सुजित हंगरकर, शहाबाद काजी, डॉ स्मिता शहापूरकर, यांनी मनोगत व्यक्त केले. मधुकरराव चव्हाण यांच्या कारकीर्दीमध्ये धाराशिव जिल्ह्याच्या विकासाला मोठी गती प्राप्त झाली होती कृषी क्षेत्रासाठी तो चांगला काळ होता असे प्रतिपादन यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे यांनी केले. वाढदिवसाच्या निमित्ताने माजी मंत्री चव्हाण यांना तुळजाभवानी देवीची प्रतिमा आणि पुष्पहार घालून टाळ्यांच्या गजरात सत्कार संपन्न झाला. आज पर्यंत केवळ काँग्रेस पक्षाने तुळजापूरच्या विकासाला आर्थिक मदत केली आहे असे उद्गार ज्येष्ठ नेते अशोक मगर यांनी काढले.
. याप्रसंगी शेतकऱ्याला उत्तर देताना माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी आपण 1960 पासून काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत जिल्ह्याचे पहिले खासदार व्यंकटराव नळदुर्गकर व बी एन देशमुख यांनी तरुण वयाचे मार्गदर्शन केले त्याच विचाराने आपण आयुष्यभर काम केले काँग्रेस पक्षाने सर्व पातळीवर वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी दिली त्या संधीचे सोने करताना आपण सामान्य माणूस व शेतकरी याला केंद्रबिंदू समजून काम केलेले असल्यामुळे धाराशिव जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला पाणी देण्याचे काम करू शकलो तुळजाभवानी शेतकरी साखर कारखाना जेव्हा स्थापन केला तेव्हा या कार्यक्षेत्रामध्ये उसाची उत्पादकता नव्हती त्यानंतर शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी प्रोत्साहन दिले आज तालुक्यामध्ये द्राक्ष ऊस फळ लागवड आणि बागायत शेती करण्यामागे केवळ आणि केवळ काँग्रेस पक्ष कारणीभूत आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला शेतमाल परदशात निर्यात केला जातो या सर्व कामाची आठवण जनतेने ठेवावी तसेच आगामी विधानसभा निवडणुकांसाठी कार्यकर्त्याकडून जो आग्रह होतो आहे त्यानुसार आपण विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊन तो पक्ष श्रेश्टीला सांगितला आहे असे याप्रसंगी त्यांनी सांगितले.
रवी कापसे,जूबेर भाई शेख,धनंजय शिंदे , सुनिल नकाते,बालाजी चूंगे,हमीद पठाण,नानासाहेब निंबाळकर, आबा गाढवे,फरीद शेख,दत्ता मस्के,रशीक वाले,मकरंद डोंगरे,रोहीत पडवळ,शाम पवार,सुनिल जाधव,स्मीता शाहापूरकर, अभिजित भैय्या चव्हाण, अमर माने ,महेश गवळी आदी धाराशिव जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे आभार माजी सभापती शिवाजी गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.