नृत्य कलावंत गौतमी पाटील वरती का होते आहे टीका

पुणे दिनांक 10 न्यूज मराठवाडा प्रतिनिधी

अल्पावधीमध्ये महाराष्ट्र मध्ये लोकप्रिय झालेली नृत्य कलावंत गौतमी पाटील वरती तिच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात दुरुस्त केल्याच्या घटनेवरून टीका सुरू झाली आहे. तिच्या वडिलांचे निधन झाले आणि निधनाच्या चार दिवसानंतर तातडीने तिने नृत्याचा कार्यक्रम केल्यावरून ही टीकेची जोड उठलेली आहे या संदर्भात उलट सुलट चर्चेला उधाण आलेले असून कोणती बाब सत्य आणि कोणती बाब चुकीची आहे याविषयी तर्कवितर्क वर्तविले जात आहेत या सर्व चर्चेच्या गदारोळ्यामध्ये नृत्यांगना गौतमी पाटील मात्र उगाचच टीकेची धनी झाली आहे.

आपला नृत्य कलेने महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये कार्यक्रम करीत असताना धमाल उडवून देणारी आणि रसिकाच्या मनावर अधिराज्य गाजवणारी गौतमी पाटील हिच्या वडीलाचे आठ दिवसांपूर्वी निधन झाले ते दुर्धर आजाराने दवाखान्यामध्ये उच्चार घेत होते अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्यानंतर पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि या दुःखामध्ये गौतमी पाटील ही देख खचून गेली ल

हिंदू संस्कृतीमध्ये कुटुंबातील व्यक्ती वारल्यानंतर 14 दिवस घरामध्ये बसून दुखवटास पाळला जातो या काळात कोणतीही काम केले जात नाही अथवा घराच्या बाहेर देखील पडले जात नाही ही प्राचीन जुनी परंपरा आहे परंतु आधुनिक कालखंडामध्ये याला काही अपवाद समोर आलेले आहेत अपवादात्मक परिस्थितीमध्ये याला देखील अनेकांनी फाटा देऊन आपल्याला योग्य वाटेल असा निर्णय घेतलेला आहे गौतमी पाटील यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर तिने चौथ्या दिवसानंतर नृत्याचा कार्यक्रम केला आणि या सर्व टीकाकारांना आणि सोशल मीडियावर असणाऱ्या भाताऱ्यांना तिच्यावर टीका करण्याची आयती संधी मिळाली तिच्या वडिलांचा उल्लेख बाप करून तिच्यावर नको ती टीका करण्यात आली आहे परंतु या टीका करांना हे माहीत नसेल की नुकत्याच रवींद्र महाजन यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा गश्मीर महाजन यांनी आपल्या डोक्याचे केस काढले नव्हते ती देखील आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये परंपरा आहे वडिलांचे निधन झाल्यानंतर केस काढले जातात परंतु त्यांनी या परंपरेला दूर करून केस न काढण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या वडिलांच्या अंत्यविधीचे सर्व विधी पूर्ण केले यामागचे कारण असे आहे की त्याचे ज्या क्षेत्रामध्ये काम चालते त्या चित्रपटसृष्टीमध्ये त्याने केस काढले असते तर त्याला पूर्वीप्रमाणे केस येण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा अथवा त्यापेक्षा जास्त काळ लागला असता आणि त्याच्या कामाच्या आणि कर्तव्याची गरज लक्षात घेऊन त्याला ते योग्य वाटले नाही म्हणून त्यांनी केस न काढता वडिलांच्या निधनाचा विधी पूर्ण केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या आईचे निधन झाल्यानंतर तातडीने आपल्या कामाला सुरुवात केली होती हा देखील काही महिन्यापूर्वीचा आपला सर्वांचा अनुभव आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर आपल्या कर्तव्याला आणि देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य देणारे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत मग त्यांनी देखील ही परंपरा खंडित करून या परंपरेपेक्षा देशाला प्राधान्य दिले क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचे वडील वारल्यानंतर त्याने देखील 14 दिवसाच्या अगोदर क्रिकेट खेळून एक शतक देखील काढले सचिन तेंडुलकर हा तर अगदी मराठमोळा तरुण आहे त्याने देखील या विधीला बाजूला ठेवून आपल्या कर्तव्याला म्हणजे क्रिकेट खेळण्याला प्राधान्य दिले ही दोन-तीन उदाहरणे पाहिल्यानंतर महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये आपल्या नृत्याच्या कलेने पोहोचलेली मराठमोळी नृत्य कलावंत गौतमी पाटील हिच्यावर टीका करणे किती योग्य आहे याचा विचार सर्वांनी केला पाहिजे आपल्या हातामध्ये सोशल मीडिया सारखे साधन आहे म्हणून त्याचा वारे माप वापर करायचा आणि कोणालाही बदनाम करायचे यापेक्षा तिने अशी भूमिका घेण्याच्या पाठीमागची कारणे कोणती आहेत याचा शोध आणि संशोधन केले असते तर त्यांना याच्या मागील वास्तव देखील लिहिता आले असते आणि ते महाराष्ट्रातल्या सर्व वाचकांनी वाचन देखील केले असते परंतु एवढा समजदारपणा आणि सामाजिक बांधिलकी आज सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांमध्ये वावरणाऱ्या लोकांमध्ये राहिली आहे का हाच खरा आज महाराष्ट्रासमोर संशोधनाचा विषय राहिलेला आहे मग अशा ट्रोल करणाऱ्या लोकांना आपण कितपत महत्त्व द्यायचे आणि त्यांचे लेखन केलेले आपण कसे वाचायचे हा प्रत्येकाचा अधिकार राहिलेला आहे आणि त्याचा विचार सर्वांनी करावा.

कलाक्षेत्रात वावरत असताना अनेक बंधने असतात अनेक जबाबदार असतात अनेक नियम अटी घालून दिलेल्या असतात या सर्वांना सोबत घेऊन काम करावे लागते याच कलेवर त्यांचा प्रपंच असतो कुटुंब असते आणि आर्थिक व्यवहार चाललेले असतात अशा बारीकसारीक गोष्टीकडे लक्ष देऊन हे कलाकार जीवन जगत असतात आणि पुढे जात असतात त्यांची चकाकणारी कला आपल्याला दिसते त्यांचे नृत्य केलेले आपण पाहतो आणि टाळ्या वाजवतो अथवा त्याच्यावर टीका टिप्पणी करतो दरम्यान प्रत्येक कलाकार पडद्यावर जसा दिसतो तसा प्रत्यक्षात नसतो हा देखील महाराष्ट्राचा इतिहास आहे अनेक कलाकारांना त्यांच्या ऊर्जित काळामध्ये जी प्रसिद्धी आणि पैसा मान प्रतिष्ठा मिळाली ती त्यांच्या वय वाढल्यानंतर अथवा वयोवृद्ध झाल्यानंतर मिळालीच आहे असे खूप कमी लोक आहेत त्यामुळे नृत्य अंगारा गौतमी पाटील हिने आपल्या वडिलांच्या निधनानंतर चौथ्या दिवसानंतर केलेले नृत्य देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि गश्मीर महाजन यांनी केलेल्या कृती प्रमाणेच आहे ते कोणतेही गैर नाही त्यामुळे त्याच्यावर टीका करणाऱ्या टीकाकारांनी आपली लेखणी इतर कामासाठी वापरली तर अधिक चांगले होईल आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी आणि कला क्षेत्रासाठी देखील तो निर्णय हितकारक असणार आहे.

प्रतिक्रिया

गौतमी पाटील ही गुणी कलावंत आहे तिने स्वतःच्या हिमतीवर प्रत्येक स्टेजवर नृत्य करून आपली ताकद दाखवून दिली आहे तिने वडिलांच्या निधनानंतर तातडीने केलेले नृत्य ही चुकीची बाब नाही ती तिच्या आयुष्याची गरज आहे त्यामुळे याबाबत मला कोणताही संकोच वाटत नाही तिच्यावर टीका करणे थांबवावे

  • प्रफुल्ल कुमार शेटे अध्यक्ष तुळजापूर संस्कार भारती.

अलीकडच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकारांना टोल केले जाते त्यांच्यावर केली जाणारी टीका देखील वास्तव नसते एक प्रकारे त्यांच्यावर तो अन्याय असतो गौतमी पाटील ही दमदार कलाकार आहे तिला सर्व महाराष्ट्राने साथ दिली पाहिजे तिच्यावर होणारे टीका तात्काळ थांबली पाहिजे तिने काहीही चुकीचे केले नाही.

राजाभाऊ गोंधळी गायकवाड अध्यक्ष महिषासुरमर्दिनी लोककला मंच तुळजापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *