धाराशिव दिनांक 2 प्रतिनिधी
न्यूज मराठवाडा या न्यूज पोर्टलच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने नवीन इच्छुक पत्रकारासाठी एक दिवशीय ऑनलाइन पत्रकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण पत्रकारांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन पत्रकार डॉ. सतीश महामुनी यांनी केले आहे.
आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणूक त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या सर्व निवडणूक काळामध्ये धाराशिव जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण पत्रकारांना मोठ्या प्रमाणावर पत्रकार म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी लागणार आहे लोकशाही मजबूत करण्याच्या आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पत्रकारांची भूमिका या काळात खूप महत्त्वाची आणि मोलाची असते समाजामध्ये जनजागृती करीत असताना कोणती खबरदारी घ्यावी, पत्रकारिता करीत असताना युट्युब चॅनेल आणि प्रिंट मीडिया यामध्ये काय फरक करावा, कायद्याच्या अनुषंगाने सुरक्षित पत्रकारिता कशी करावी, आपल्या पत्रकार व्यवसायामध्ये कोणकोणती आचारसंहिता पाळावी, बातमी लेखनामध्ये महत्त्वाचे मुद्दे आणि बातमी लेखनाची पद्धती, बातमीदारी करीत असताना जाहिरातीचे व्यवस्थापन कसे करावे, वृत्तपत्र यूट्यूब चैनल आणि जाहिरात यांचा ताळेबंद, जाहिरातीचे मागणी पत्र आणि वसुलीचे तंत्र, सन्मानाची पत्रकारिता आणि लोक उपयोगी उपक्रम, पत्रकारांची सामाजिक बांधिलकी आणि कौटुंबिक जबाबदारी, बदलती पत्रकारिता आणि बदलते राजकारण, राजकीय क्षेत्र आणि औद्योगिकीकरण या अनुषंगाने पत्रकारांची भूमिका, ग्रामीण भागाच्या विकासात वृत्तपत्र आणि पत्रकारांची भूमिका, पत्रकारांची कर्तव्य आणि आचारसंहिता, राजकीय पक्ष पक्षाची पदाधिकारी नेतेमंडळी आणि पत्रकार यांचे संबंध, सकारात्मक पत्रकारिता कशी करावी, अत्यंत छोट्या गावात राहत असताना पत्रकारांनी कोणकोणते विषय कसे हाताळावेत, तालुका आणि जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांची जबाबदारी या आणि अशा अनेक विषयावर आपण ऑनलाइन पद्धतीने सदर कार्यशाळा आयोजित करीत आहोत या कार्यक्रमामध्ये च्या नवोदित पत्रकारांना आणि पत्रकारिता क्षेत्रात नव्याने येणाऱ्या तरुणांनी 98 90024 910 या मोबाईल क्रमांकावर आपली नोंदणी करावी. आपले नाव आपले गाव आपली आवड आपला मोबाईल क्रमांक आणि कोणत्या यूट्यूब चैनल किंवा वृत्तपत्रासाठी आपण काम करतात अशी माहिती सोबतच्या मोबाईल क्रमांकावर पाठवावी. कार्यशाळा चे वेळापत्रक आणि इतर माहिती आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर व्यक्तिगत रित्या कळवली जाईल. ज्या नवोदित पत्रकारांना न्यूज मराठवाडा या न्यूज पोर्टलमध्ये पत्रकार म्हणून काम करण्याची इच्छा असेल त्यांनी त्या संदर्भात आपले निवेदन मोबाईल क्रमांकावर करावे. मानधन अथवा कमिशन या संदर्भात व्यक्तिगत संपर्क साधून आपणास माहिती दिली जाईल. प्रत्येक पत्रकाराला मानधन अथवा कमिशन देण्यासंदर्भात सर्व अधिकार व्यवस्थापनाकडे आहेत. Contact online workshop 98900 24910