तुळजापूर दिनांक 17 प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर येथील प्राध्यापक रत्नाकर कमलाकर उपासे यांना जळगाव येथील वसूलंदिनी फाउंडेशन जामनेर साहित्य संस्थेच्या वतीने राज्यभरातील मानाचा आणि सन्मानाचा कथासंग्रह साहित्य पुरस्कार ” राष्ट्रीय वसु नंदिनी उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार “प्राप्त झाला आहे.
मूळ मंगरूळ तालुका तुळजापूर येथील रहिवासी असणारे प्राध्यापक रत्नाकर कमलाकर उपासे हे आपल्या परिसरातील लोकप्रिय कथा लेखक आहेत. ग्रामीण जीवनावर प्रकाश टाकणारी “बदबदी काठची सोनपावलं” हा कथासंग्रह त्यांनी लिहिला आहे यामध्ये त्यांनी आपल्या स्वतःच्या मंगरूळ गावांमधील गाव पातळीवर लोकप्रिय असणाऱ्या व्यक्ती महत्त्वाचा उपयोग करून या कथासंग्रहाला आकार दिला आहे वेगवेगळ्या अतिशय रंजक आणि वास्तववादी कथांचे लेखन अत्यंत शैलीदार आणि लोकप्रिय लोक भाषेमध्ये केलेला आहे. जामनेर येथील वसु नंदनी फाउंडेशनच्या वतीने या पुस्तकाच्या लेखन शैली, शुद्धलेखन, लिखाणाची धाटणी आणि साहित्याचा दर्जा या पातळीवर मूल्यमापन करून प्राध्यापक रत्नाकर कमलाकर उपाशी यांना हा राष्ट्रीय पातळीवर दिला जाणारा राष्ट्रीय वसुनंदनी उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार 2024 घोषित करण्यात आला आहे. या संस्थेच्या सचिव सौ माधुरी कुलकर्णी यांनी त्यांना पुरस्कार प्राप्त झाल्याचे पत्र देऊन निमंत्रित केले आहे.
राज्यातील साहित्य लेखनाची काम करणाऱ्या साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही संस्था प्रतिवर्षी राष्ट्रीय स्तरावर हा पुरस्कार प्रदान करते यावर्षी धाराशिव जिल्ह्यातील प्राध्यापक रत्नाकर उपासे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्यभरातील साहित्यिकांनी त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव सुरू केला आहे त्यांच्या साहित्य लेखनाच्या आणि विषय मांडणीच्या दर्जाबद्दल त्यांचे विशेष कौतुक या निमित्ताने होत आहे. आपला परिसर आणि आपली भाषा तसेच आपल्या अवतीभवती घडणारे प्रसंग या अनुषंगाने प्राध्यापक रत्नाकर उपाशी यांनी केलेले हे लेखन निश्चितच इतर साहित्य प्रेमींना प्रोत्साहन देणारे आहे.